
चांगभलं ऑनलाइन | मुंबई प्रतिनिधी
शरद पवार यांच्या गटाकडून नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद पवार , नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, आणि नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदराव पवार अशा तीन नावांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला होता. यापैकी एक नावाला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.
याबाबतची माहिती अशी, केंद्रीय निवडणूकआयोगाने काल राष्ट्रवादी पक्षाबाबतचा निर्णय देताना ‘राष्ट्रवादी’ हे पक्षाचे नाव आणि ‘घड्याळ’ हे चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. हा निकाल देतानाचो आज दुपारी चार वाजेपर्यंत शरद पवार गटानं आपल्या पक्षाचं नवं नाव आणि चिन्ह सांगावे असा आदेश निवडणूक आयोगाने दिला होता. त्यानुसार शरद पवार गटाकडून पक्षाच्या नावाचे तीन प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यापैकी एका नावावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे.
शरद पवार यांच्या गटाकडून नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, आणि नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार अशा तीन नावांचा प्रस्ताव आयोगाकडे पाठवण्यात आला होता. यापैकी निवडणूक आयोगाने ‘नॅशनॅलिस्ट (राष्ट्रवादी ) काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार ‘ या नावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे शरद पवार गटाची नवी ओळख आता ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ अशी असणार असल्याचं वृत्त एका आघाडीच्या दूरचित्र न्यूजवाहिनीने दिलं आहे.