Uncategorized
दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. जे. टी. भिंगारदेवे यांचे निधन
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
दलित चळवळीचे ज्येष्ठ नेते, कराड तालुका खादी ग्राम उद्योग व खंडोबा प्रसन्न साखर कारखान्याचे संस्थापक प्रा. जिजाबा तुकाराम भिंगारदेवे उर्फ जे .टी.भिंगारदेवे (आबा) यांचे रविवारी अल्पशा आजाराने उपचारादरम्यान पुणे येथे निधन झाले.जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून त्यांनी चांगले काम केले.तर विधासभा व लोकसभा निवडणूक ही त्यांनी लढवली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.