ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील यांचे निधन – changbhalanews
Uncategorized

ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील यांचे निधन

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचे माजी सभापती भीमरावदादा पाटील (वय 92) यांचे वृद्धापकाळाने बुधवारी पहाटे निधन झाले. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकारणावर तब्बल 60 वर्ष त्यांनी पकड ठेवली होती.

काले गावचे सरपंच म्हणून भीमरावदादा पाटील यांनी 1962 ते 1967 या काळात राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 1967 ते 1972 या काळात कराड पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम केले. पुढे 1972 ते 1977 मध्ये ते कराड पंचायत समितीचे सभापती झाले. या काळात कराड पंचायत समितीमध्ये त्यांनी अमुलाग्र बदल केले. अनेक भरीव कामे करून तालुक्याचा नावलौकिक वाढवला. 1977 ते 1979 आणि 2005 ते 2008 असे दोनवेळा त्यांनी जिल्हा परिषदेचे कृषि सभापती म्हणून काम पाहिले. या काळात शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या अनेक योजना त्यांनी प्रभावीपणे राबवल्या. अनेक वर्ष कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी काम केलं. 1980 ची विधानसभा निवडणुकही भीमरावदादांनी लढवली होती. त्यांना राज्य शासनाकडून दलित मित्र पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

तळागाळातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी असलेली नाळ हे भीमरावदादांच्या राजकारणाचे वैशिष्टं राहिले. काले पंचक्रोशीत दादांचा शब्द प्रमाण मानला जाईल. अतिशय परखड आणि स्पष्टवक्ते म्हणून तालुक्याच्या राजकारणात त्यांची ओळख होती. काले जिल्हा परिषद मतदार संघावर त्यांनी एकहाती वर्चस्व ठेवले होते. त्यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काले पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close