महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातून आठ खेळाडूंची निवड
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने आणि सातारा जिल्हा कुस्तीगीर संघ आयोजित खराडी (पुणे) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सातारा जिल्हा संघाची निवड चाचणी कॅप्टन खाशाबा दाजी शिंदे आणि महाराष्ट्र केसरी संजय पाटील (दादा) कुस्ती संकुल सैदापूर येथे घेण्यात आली, या स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातून 70 महिला कुस्तीगीरांनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेचे उद्घाटन सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष महाराष्ट्र केसरी बापू दादा लोखंडे यांच्या हस्ते झाले. तसेच या प्रसंगी हिंदकेसरी संतोष आबा वेताळ, उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघम, उपमहाराष्ट्र केसरी आबा सूळ, सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस पै. धनंजयकाका पाटील आटकेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी प्रा. पै. अमोल साठे, रमेश थोरात, सुनील लोखंडे आणि सुशांत माने यांनी पंच म्हणून काम पाहिले. निवड झालेल्या महिला खेळाडूंचे अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या महिला खेळाडू पुढीलप्रमाणे-
१)५०kg श्रेया दीपक मांडवे
२)५३kg ऋतुजा किशोर पवार
३)५५kg प्राची आबासो सावंत
४)५९ kg आर्या धनंजय पवार
५)६५kg शर्मिला सीतामणी नाईक
६)६८kg वेदांतिका अतुल पवार
७)७२kg उज्वला तानाजी साळुंखे
८) महाराष्ट्र केसरी खुला गट(६८ते ७६)
रेश्मा सुदाम डफळ