टिळक हायस्कूलमध्ये शाळा व्यवस्थापन समिती गठित – changbhalanews
शैक्षणिक

टिळक हायस्कूलमध्ये शाळा व्यवस्थापन समिती गठित

कराड, दि. २६ जून | चांगभलं वृत्तसेवा
शिक्षण मंडळ कराड संचालित टिळक हायस्कूल, कराड येथे शाळा व्यवस्थापन समितीचे (School Management Committee) नियमानुसार गठन करण्यात आले. ही समिती पुढील दोन वर्षे कार्यरत राहणार असून, तिचे अध्यक्षपद शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब तथा भालचंद्र कुलकर्णी यांच्याकडे पदसिद्ध स्वरूपात देण्यात आले आहे.

समितीच्या उपाध्यक्षपदी सुधाकर शिवाजीराव गायकवाड यांची पालक प्रतिनिधींच्या सभेमधून एकमताने निवड करण्यात आली. तर मुख्याध्यापक धनाजीराव देसाई हे पदसिद्ध सचिव म्हणून काम पाहतील.

समितीचे सदस्य म्हणून पालक प्रतिनिधी सभेतून खालील सदस्यांची निवड करण्यात आली:
मेघा सचिन कोकणे
पुष्पा अमर किरपेकर
रूपाली दयानंद नलवडे
सुमन संजय ढोले
प्रशांत चंद्रकांत बडेकर
सुजित दिनकरराव माने
अनिल जगन्नाथ शिंदे
महेश जयसिंग तांबे
निवास बाबुराव थोरात
सयाजीराव व्यंकटराव पाटील
अंकुश विठोबा माळी
शिक्षक सदस्य प्रवर्गातून आशाराणी भास्कर गंबरे व आबाजी शामराव मोरे यांची निवड करण्यात आली.

नविन समितीतील सर्व पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन मुख्याध्यापक धनाजीराव देसाई, उपमुख्याध्यापक किसन वाघमारे, पर्यवेक्षक शरद शिंदे, तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक प्रतिनिधींनी केले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close