शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. मान्सून केरळात आला! – changbhalanews
शेतीवाडी

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. मान्सून केरळात आला!

पुढील दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार

मुंबई | चांगभलं वृत्तसेवा
हवामान विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून शेतकरी वाट पाहत असलेला मान्सूनचा पाऊस केरळात यंदा आठवडाभर आधीच दाखल झाला आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात सुरू होणार आहे. मुंबईमध्ये १ जूनला मान्सून पावसाला सुरुवात होईल.

भारतातील केरळला मान्सूनचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते. दरवर्षी 1 जूनपर्यंत मान्सून पाऊस केरळात दाखल होत असतो. यंदा मात्र आठवडाभर आधीच मान्सून केरळात दाखल झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात प्रवेश करतील. सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यामुळे कोकणासह महाराष्ट्राच्या विविध भागात मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. त्यातच मान्सून आठवडाभर आधीच केरळात दाखल झाल्याने महाराष्ट्रात पुढच्या दोन ते तीन दिवसात पावसाला सुरुवात होणार आहे .‌मुंबईमध्ये 1 जूनला मान्सूनचा पाऊस सुरू होईल, अशी हवामान विभागाकडील माहिती आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close