दिल्लीतील राष्ट्रीय चित्रप्रदर्शनात कराडच्या सतीश गायकवाड यांच्या “Rhythm” आणि “Harmony” कलाकृतींची निवड! – changbhalanews
कलारंजन

दिल्लीतील राष्ट्रीय चित्रप्रदर्शनात कराडच्या सतीश गायकवाड यांच्या “Rhythm” आणि “Harmony” कलाकृतींची निवड!

कराड प्रतिनिधी, दि. 25 | चांगभलं वृत्तसेवा
श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्टच्या मसूर येथील श्री शिवाजी विद्यालयातील कलाशिक्षक सतीश रा. गायकवाड यांनी दिल्लीत होणाऱ्या “एक्सपोपिडिया” या राष्ट्रीय चित्र व शिल्प प्रदर्शनात यशस्वी सहभाग नोंदवला आहे. हे प्रदर्शन २५ ते ३० जून २०२५ दरम्यान व्हिज्युअल आर्ट गॅलरी, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात देशभरातील मान्यवर चित्रकार व शिल्पकारांनी सहभाग घेतला असून, त्यांच्या निवडक कलाकृती प्रदर्शित करण्यात येत आहेत. यामध्ये सतीश गायकवाड यांच्या “Rhythm” आणि “Harmony” या संगीतप्रेरित चित्रांची निवड करण्यात आली आहे. रंगसंगती, रचना आणि विषय मांडणी यामुळे त्यांच्या चित्रांना विशेष दाद मिळत आहे.
सतीश गायकवाड यांना यापूर्वीही मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी (२०१४ आणि २०२४), बाळगंधर्व रंगमंदिरटिळक स्मारक (पुणे), तसेच कोल्हापूर, सातारा, कराड, सांगली, हैद्राबाद आदी ठिकाणी झालेल्या विविध प्रदर्शनांतून उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे. निसर्गचित्रे, रचनाचित्रे व व्यक्तिचित्रण ही त्यांची खास शैली मानली जाते.
विशेष म्हणजे, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त (२०१२-१३) त्यांनी १२ चित्रांची मालिका तयार करून वेणुताई चव्हाण ट्रस्ट, कराड येथे सादर केली होती. या कलाप्रदर्शनाला देखील मोठा प्रतिसाद मिळाला होता.

कलाशिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना चित्रकलेतील मूलभूत संकल्पनांचे उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे. सी.सी.आर.टी. (नवी दिल्ली) आयोजित परीक्षेमध्ये त्यांच्या ५ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर यश मिळवत शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. त्यांच्या प्रशिक्षणाखाली अनेक विद्यार्थी कला क्षेत्रात आपले नाव कमावीत आहेत.

या यशाबद्दल शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्टचे अध्यक्ष जयंत पाटील, सचिव संजय बदीयानी, सर्व संचालक, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

📎चांगभलं न्यूजला सोशल मीडियावर फॉलो करा!
🕊️ X (Twitter):
Follow करा 👉 @ChangbhalaNews
📢 ताज्या अपडेट्स, व्हायरल थ्रेड्स आणि ब्रेकिंग न्यूजसाठी!
📸 Instagram:
Follow करा 👉 instagram.com/changbhala.news?igsh=cTQwMzB3ZXBoOHpu
🎥 ग्राउंड रिपोर्ट्स, रील्स आणि बातम्यांचे व्हिज्युअल कव्हरेज – फक्त Instagram वर!
📘 Facebook:
Like करा 👉 facebook.com/profile.php?id=61552122239763
📲 तुमच्या परिसरातील लाईव्ह अपडेट्स, थेट प्रसारण आणि विशेष बातम्यांसाठी आम्हाला Facebook वर Like करा!
📌 #ChangbhalaNews – तुमच्या गावाची, तुमच्या मनातली बातमी

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close
WhatsApp Group
22:42