सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आता झाले प्रादेशिक परिवहन कार्यालय
विनोद चव्हाण ठरले पहिले प्रादेशिक परिवहन अधिकारी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सातारा जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला आता प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणून मान्यता मिळाली आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय नव्याने झाले असल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पद संपुष्टात येऊन परिवहन अधिकारी नव्याने पद निर्माण झाले आहे.
जिल्ह्यत या पदाचा पहिला मान हा विनोद चव्हाण यांना मिळाला आहे. राज्याच्या गृहविभागाने नुकताच हा निर्णय घेतला. परिवहन अधिकारी कार्यालय म्हणून मान्यता मिळाल्यानंतर या कार्यालयात प्रादेशिक परिवहन अधिकारी, दोन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यासह कार्यालयीन कर्मचाऱ्यांची संख्या वाढली जाणार आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाच्या शिफारशीनुसार राज्यातील ९ नवनिर्मित प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे सोपवला गेला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याचे पहिले प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून विनोद चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे.