राजकिय
सातारा लोकसभा सार्वजनिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित
चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला असून या कार्यक्रमांनुसार महाराष्ट्र राज्यांमध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाचा तिसऱ्या टप्प्यात समावेश असून निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक 12 एप्रिल रोजी, नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 19 एप्रिल, नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक 20 एप्रिल पर्यंत असेल, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 22 एप्रिल असेल, दिनांक 7 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. दिनांक 4 जून रोजी मतमोजणी होईल. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 6 जून 2024 आहे.