स्व.खाशाबा जाधव चषक स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याचा संघ जाहीर

निवड झालेले खेळाडू
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन -क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने, उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी स्व खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 2023 -24 या स्पर्धेचे आयोजन दिनांक 8 मार्च ते 12 मार्च यादरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याचा संघ निवड चाचणी घेण्यात आली होती. सदर स्पर्धा ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येते आणि शासनाच्या वतीने या स्पर्धेचे बजेट तीन कोटी रुपये पर्यंतचे आहे. यामुळे या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना आणि विजेत्या स्पर्धकांना आर्थिक बक्षीस खूप मोठ्या प्रमाणात आहेत.
. जिल्हा कुस्तीगीर संघ सातारा यांच्यावतीने कराड येथे कॅप्टन खाशाबा दाजी शिंदे आणि महाराष्ट्र केसरी संजय पाटील दादा कुस्ती केंद्र सैदापूर या ठिकाणी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दहा वजन गटासाठी या स्पर्धेची निवड चाचणी घेण्यात आली या निवड चाचणीत जिल्ह्यातून 90 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
सातारा जिल्ह्यातून अनेक ज्येष्ठ पैलवान या स्पर्धेसाठी उपस्थित होते तसेच, या स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंना जिल्हा कुस्तीगीर संघ साताराचे अध्यक्ष महाराष्ट्र केसरी बापू दादा लोखंडे आणि सरचिटणीस धनंजय पाटील आटकेकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून प्रा पै अमोल साठे यांनी काम पाहिले तसेच पंच म्हणून पै रमेश थोरात सर , पै अमोल नरळे सर, प्रा सुनील लोखंडे, रवींद्र शेळके सर यांनी काम पहिले.
दरम्यान, महाराष्ट्रातील वरिष्ठ स्तरावर असणारे कुस्ती संघटनांचे वाद आता जवळजवळ मिटलेत असे दिसायला लागला आहे. कारण शासनाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ या संघटनेला याबाबतचे अधिकार दिले आहेत.