सातारा जिल्ह्यात सरपंच पदाच्या फेरआरक्षणाची सोडत ४ जुलैला; १५०० ग्रामपंचायतींसाठी आरक्षण निश्चित होणार

सातारा , २७ जून २०२५ | चांगभलं वृत्तसेवा
सन २०२५ ते २०३० या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंच पदांच्या आरक्षणाबाबत सातारा जिल्ह्यात फेर आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले असून ही सोडत शुक्रवार, दि. ४ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
सातारा तालुक्यातील १९७ व कराड तालुक्यातील २०१ ग्रामपंचायतींसह संपूर्ण जिल्ह्यातील १५०० ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिलांचे आरक्षण समाविष्ट आहे.
📊तालुका निहाय सरपंच आरक्षणाचा तपशील २०२५-२०३० (महिला / खुला):
सातारा (१९७ ग्रामपंचायती) – अनुसूचित जाती महिला – ११, खुला – ११; अनुसूचित जमाती महिला – १; मागास प्रवर्ग महिला – २७, खुला – २६; सर्वसाधारण महिला – ६१, खुला – ६०
कोरेगाव (१४२ ग्रामपंचायती) – अनुसूचित जाती महिला – ७, खुला – ६; मागास प्रवर्ग महिला – १९, खुला – १९; सर्वसाधारण महिला – ४५, खुला – ४५
जावळी (१२५ ग्रामपंचायती) – अनुसूचित जाती महिला – ५, खुला – ४; अनुसूचित जमाती महिला – १, खुला – १; मागास प्रवर्ग महिला – १७, खुला – १७; सर्वसाधारण महिला – ४०, खुला – ४०
वाई (९९ ग्रामपंचायती) – अनुसूचित जाती महिला – ४, खुला – ४; अनुसूचित जमाती महिला – १, खुला – १; मागास प्रवर्ग महिला – १४, खुला – १३; सर्वसाधारण महिला – ३०, खुला – ३०
महाबळेश्वर (७१ ग्रामपंचायती) – अनुसूचित जाती महिला – ३, खुला – ३; अनुसूचित जमाती महिला – ३, खुला – २; मागास प्रवर्ग महिला – ११, खुला – १०; सर्वसाधारण महिला – २४, खुला – २३
खंडाळा (६३ ग्रामपंचायती) – अनुसूचित जाती महिला – ३, खुला – २; मागास प्रवर्ग महिला – ९, खुला – ८; सर्वसाधारण महिला – २१, खुला – २०
फलटण (१३१ ग्रामपंचायती) – अनुसूचित जाती महिला – १०, खुला – ९; अनुसूचित जमाती महिला – १; मागास प्रवर्ग महिला – १८, खुला – १७; सर्वसाधारण महिला – ३८, खुला – ३८
माण (९५ ग्रामपंचायती) – अनुसूचित जाती महिला – ७, खुला – ६; मागास प्रवर्ग महिला – १३, खुला – १३; सर्वसाधारण महिला – २८, खुला – २८
खटाव (१३३ ग्रामपंचायती) – अनुसूचित जाती महिला – ६, खुला – ६; मागास प्रवर्ग महिला – १८, खुला – १८; सर्वसाधारण महिला – ४३, खुला – ४२
कराड (२०१ ग्रामपंचायती) – अनुसूचित जाती महिला – १२, खुला – १२; अनुसूचित जमाती महिला – १; मागास प्रवर्ग महिला – २७, खुला – २७; सर्वसाधारण महिला – ६१, खुला – ६१
पाटण (२३५ ग्रामपंचायती) – अनुसूचित जाती महिला – ११, खुला – १०; अनुसूचित जमाती महिला – १; मागास प्रवर्ग महिला – ३२, खुला – ३२; सर्वसाधारण महिला – ७५, खुला – ७४
♦️जिल्हास्तरावरील आरक्षण विभागणी खालीलप्रमाणे आहे:
अनुसूचित जाती (SC): ८० पदे (महिला – ८०, खुला – ७४)
अनुसूचित जमाती (ST): ८ पदे (महिला – ८, खुला – ६)
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC): २०५ पदे (महिला – २०५, खुला – २००)
सर्वसाधारण प्रवर्ग: ४६६ पदे (महिला – ४६६, खुला – ४६१)
➤ एकूण सरपंच पदे: १५००
🌐 कायदेशीर पार्श्वभूमी:
ग्रामविकास विभागाच्या १३ जून २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ व निवडणूक नियम १९६४ च्या तरतुदीनुसार आरक्षण निश्चित केले जात आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या व मागील आरक्षणांची फेरतपासणी करून आरक्षण निश्चिती केली जात आहे.
📍 सोडतीचे ठिकाण व वेळ:
सातारा तालुका: छत्रपती अभयसिंहराजे भोसले सभागृह, पंचायत समिती सातारा, सकाळी ११ वा.
कराड तालुका: यशवंतराव चव्हाण सभागृह (टाऊन हॉल), सकाळी ११ वा.
सदर आरक्षण सोडतीसाठी आमदार, तहसीलदार, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्रभारी तहसीलदार सुजाता पाटील व कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांनी केली आहे.
🛑 लक्षवेधी मुद्दे:
१. गाव निहाय आरक्षणाची माहिती दवंडी, नोटीस फलक व स्थानिक वृत्तपत्रांद्वारे तीन दिवस प्रसारित करण्यात येणार आहे.
२. ग्रुप ग्रामपंचायतींच्या बाबतीत महसूली गावे एकत्रित करून आरक्षण निश्चिती करण्यात येणार आहे.
३. आरक्षण निश्चितीनंतर संबंधित तहसीलदारांनी कार्यवृत्त त्वरीत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे बंधनकारक असणार आहे.
📰 “आपल्या गावाची, आपल्या मनातली बातमी – फक्त चांगभलं न्यूजवर!”
📲 खालील प्लॅटफॉर्मवर आम्हाला Follow / Subscribe करा: 📷 Instagram ▶️ YouTube 🐦 X
📘 Facebook 🗞️ Dailyhunt
❤️ Like करा ↗️ शेअर करा 🔔 रहा अपडेट