चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ सांगली, यांच्यावतीने बालनाट्य स्पर्धांचे विभागीय स्तरावर आयोजन करण्यात आले होते. १५ डिसेंम्बर रोजी झालेल्या या स्पर्धेमध्ये ‘थोडी माणुसकी जपुया’ या नाटकाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. श्री संत तुकाराम हायस्कुलच्या ११ बाल कलाकारांनी हे नाट्य सादर केले.
या लघुनाटिकेचे दिगदर्शन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. भालेराव यांनी केले, लेखन ज्ञानेश्वर कल्याणकर यांनी केले, या नाटकास पार्श्वसंगीत अभिजित भोपते यांनी दिले, तसेच नेपथ्य व वेशभूषा कल्याणकर मॅडम यांनी केली होती. प्रथम क्रमांकासह उत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम क्रमांक- सौ. भालेराव मॅडम, ‘उत्कृष्ट मुलीं अभिनय प्रथम – कु. अपेक्षा पवार, द्वितीय- कु. जिया मुल्ला अशी एकूण चार बक्षिसे या लघुनाटिकेस मिळाली. विद्यालयाच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.