सैदापुर-विद्यानगरात खंडणी मागणारा जेरबंद
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड शहरालगत असलेल्या विद्यानगर-सैदापुर परीसरात धारधार शस्त्राचा धाक दाखवुन खंडणी मागणाऱ्यास गुंडास कराड शहर पोलिसांच्या डीबी पथकाने अटक केली आहे.
पोलिसांकडील माहिती अशी, दिनांक 25/01/2024 रोजी रात्री 20.15 वाजताचे दरम्यान कराड शहरालगत असलेल्या विद्यानगर-सैदापुर परिसरात एक इसम हातात धारधार शस्त्र घेवुन दहशत माजवत असुन तेथील छोटया मोठ्या व्यवसायीकांना धमकावुन खंडणी मागत असल्याबाबतची माहिती कराड शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना मिळाली होती. त्याबाबत त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील यांना तात्काळ कारवाई करणेबाबत सूचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांनी डी. बी पथकासह घटनास्थळी दाखल होवुन सराईत संशयित कुंदन जालिंदर कराडकर रा. गजानन सोसायटी , कराड ता. कराड जि. सातारा यास धारधार शस्त्रासह ताब्यात घेवून अटक केली. त्याच्यावर कराड शहर पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पी. पाटील, सफौ संजय देवकुळे, रघुवीर देसाई, हवालदार शशिकांत काळे, संतोष पाडळे, कुलदिप कोळी, महेश शिंदे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केली.