सैदापूर येथील छ. शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते संपन्न – changbhalanews
राजकिय

सैदापूर येथील छ. शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत - पृथ्वीराज चव्हाण ; माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
आज सुमारे साडे तीनशे वर्षा नंतरही छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यानंतर मराठी माणसाचे रक्त सळसळते आणि आपसुकच तोंडातून छत्रपती शिवाजी महाराज कि जय असा जयघोष बाहेर पडतो. आणि एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. या सर्वांचे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सैदापूर येथे आयोजित कार्यक्रमात केले.

यावेळी रयत कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, उपाध्यक्ष नितेश उर्फ नाना जाधव, प्रा. धनाजी काटकर, तालुका खादी ग्रामोद्योगाचे शिवाजी जाधव, इंद्रजित चव्हाण, माजी उपसरपंच सचिन पाटील, दत्तात्रेय जाधव, राजेंद्र जाधव, तानाजी माळी, विवेक जाधव, धनाजी जाधव, सतीश जाधव, वैशाली जाधव, आदित्य काळभोर आदिसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. सैदापूर येथे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून सैदापूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सुधारणा करणेसाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणसाठी निधी उपलब्ध झाला असून या कामाचे भूमिपूजन आ. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

सैदापूर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सैदापूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सुधारणा करणेसाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणसाठी मागणी केली होती त्यानुसार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला असून त्यास प्रशासकीय मंजुरी सुद्धा मिळाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. यासाठी गावातील छ. शिवाजी महाराजांचे स्मारक हे प्रेरणा देणारे ठरावे यासाठी सैदापूर गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी या चौकाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याप्रमाणे प्रस्ताव माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सादर केला. त्यानुसार आ. चव्हाण यांनी सुद्धा आलेल्या प्रस्तावाची दखल घेऊन लवकरात लवकर निधी मिळण्यासाठी प्रयत्न केले त्यानुसार हा निधी मंजूर झाला आहे. सैदापूर गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व चौकाचे सुशोभीकरण व सुधारणा चांगल्या पद्धतीने करता येणार आहे, मंजूर निधीमुळे सैदापूर ग्रामस्थ व शिवप्रेमीनी आनंद व्यक्त केला आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close