Uncategorized
मनोहर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरास प्रतिसाद
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
मलकापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, दि. 8 रोजी गांधी फौंडेशन, कराड व सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यावतीने मलकापूर (लक्ष्मीनगर) येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गांधी फौंडेशनच्या सहकार्याने 300 जणांची नेत्र तपासणी व चष्मे वाटप केले. तसेच रुग्णांना पुणे येथे मोफत उपचार दिले जाणार आहेत.
सह्याद्री सुपन स्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत 40 गरोदर मातांची तपासणी व 310 नागरिक व महिलांची तपासणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक राजेंद्र यादव, प्रशांत चांदे, कमल कुराडे, किशोर येडगे, नारायण रैनाक, अमर इंगवले, आनंदी शिंदे, माधुरी पवार, गितांजली पाटील, भारती पाटील, पुजा चव्हाण, शकुंतला शिंगण, स्वाती तुपे, नंदा भोसले, अलका जगदाळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती दर्शवली.