कृष्णा विश्व विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा – changbhalanews
शैक्षणिक

कृष्णा विश्व विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या प्रांगणात कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहाच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहातील सिक्युरिटी फोर्सचे जवान, विविध संस्थांतील विद्यार्थ्यांनी शानदार ध्वजसंचलन केले.

कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते आणि प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य श्री. विनायक भोसले, सौ. मनिषा मेघे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. यानंतर डॉ. सुरेश भोसले व डॉ. शिनगारे यांच्यासोबत उपकुलसचिव एस. ए. माशाळकर यांनी सुरक्षारक्षक आणि महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) कॅडेटस् कडून मानवंदना स्वीकारली.

याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, मेडिकल अॅडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, डॉ. डी. के. अगरवाल, डॉ. एस. आर. पाटील, सी. एन. देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

ध्वजवंदनानंतर कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहातील विविध सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी सुरक्षा अधिकारी दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली शानदार ध्वजसंचलन केले. तसेच यावेळी कृष्णा शैक्षणिक समूहातील विविध शाळा – महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.

याप्रसंगी कृष्णा वैद्यकीय विज्ञान विभागाच्या अधिष्ठाता डॉ. युगंतरा कदम, दंतविज्ञानचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी., फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजूलु, नर्सिंग विज्ञानच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, अलाईड सायन्सचे अधिष्ठाता डॉ. गिरीश पठाडे, फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव, फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या शुभांगी पाटील आदींसह प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close