चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
लोकनेते विलासकाका पाटील रयत सहकारी साखर कारखाना नामकरणाच्या ठरावास 28 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन अँड उदयसिह पाटील – उंडाळकर हे होते.
शेवाळेवाडी (म्हासोली) ता.कराड येथील कारखाना कार्यस्थळावर ही सभा सपन्न झाली. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन आप्पासाहेब गरुड, अथणी -रयत चे युनिट हेड रवींद्र देशमुख,कोयना सहकारी दूध संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई,कराड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते,कोयना बँकेचे चेअरमन रोहित पाटील,शामराव पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे,कराड बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील प्रा.धनाजी काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेत बोलताना ऍड उदयसिंह पाटील म्हणाले,रयत कारखाना उभारणी पाठीमागे संस्थापक काका चा जो उद्देश होता तो सफल होताना दिसत आहेत.आज आपल्यात काका नाहीत मात्र त्याचे विचार जोपासण्याचे काम आम्ही करत आहोत.गेली ५० वर्षे काकांनी सहकार,समाजकारण,
राजकारणाला मार्गदर्शन केले रयत कारखाना सारख्या संस्था उभारल्या.रयत कारखाना अडचणीतून बाहेर पडावा यासाठी त्यांनी अथणी कारखाण्याबरोबर करार केला त्यास यश येऊन आज रयत शासकीय देणे वगळता पूर्ण कर्जमुक्त झाला आहे.गतवर्षी पासून ५ हजार मे टन क्षमतेने गाळप व वीज प्रकल्प सुरू झाला आहे.हे प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी आणखी बळकटी मिळाली आहे.यापुढील काळात रयत च्या माध्यमातून
डीस्टलरी प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा करून कर्मचारी,सभासदाच्या हितासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली.
रवींद्र देशमुख कारखान्याचा आढावा घेताना म्हणाले,चालू गळीत हंगामात कारखान्याने गाळपास आलेल्या उसास तालुक्यात उच्चाकीं असा प्रति टन 3150 एक रक्कमी भाव दिला आहे.यावर्षी 8 हजार हेक्टर पेक्षा जास्त ऊस नोंद झाली असून 650 पेक्षा अधिक तोडणी वाहतूक करार झाले आहेत.कारखान्याची ऑफ सिझन ची कामे पूर्ण झाली असून गळीत हंगामस सभासद,शेतकरी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी संस्थापक स्व. विलासराव पाटील(काका) यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सभेत विषय पत्रिकेचे वाचन शैलेश देशमुख यांनी केले. सर्व विषय एकमताने मंजूर करणेत आले. ऐन वेळच्या विषयात कराड पंचायत समितीचे उसभापती रमेश देशमुख यांनी रयत कारखान्याचे संस्थापक विलासकाका पाटील यांच्या स्मृती जपण्यासाठी कारखान्यास लोकनेते विलासकाका पाटील रयत सहकारी साखर कारखाना असे नामकरण करण्याचा ठराव मांडला त्यास सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली.
प्रास्ताविक संचालक प्रदीप पाटील यांनी तर आभार संचालक ऍड शंकरराव लोकरे यांनी मानले.सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले.सभेस कारखान्याचे संचालक बाजीराव शेवाळे,पी बी शिंदे,प्रशांत पाटील,अर्जुन पवार,आनंदराव पाटील,आत्माराम देसाई,शशिकांत साठे,जयवंतराव बोन्द्रे,जगन्नाथ माळी, तुकाराम काकडे,हिम्मत पाटील,पंजाबराव देसाई, विजया माने,हिम्मत पाटील,हणमंतराव चव्हाण,निवासराव निकम कारखान्याचे सभासद,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कारखाना सुरू करणार डिस्टलरी प्रकल्प…
रयत सहकारी साखर कारखान्याची सध्या 16 कोटींचे प्लस नेटवर्थं असून अपूर्ण सभासद भाग भांडवलाच्या माध्यमातून 14 ते 15 कोटी रक्कम जमा करून डिस्टलरी प्रकल्प सुरू करण्याची घोषणा चेअरमन उदयसिंह पाटील यांनी केली.
सभासदांना 5 ऐवजी 50 किलो साखर…
रयत कारखान्याने यावर्षी पासून 15000 भागभांडवल पूर्ण करणाऱ्याच सभासदास सवलतीच्या दरात 5 ऐवजी 50 किलो साखर देणार असल्याची घोषणा उदयसिंह पाटील यांनी करून 15 ऑक्टोबर पर्यंत रक्कम भरणाऱ्या सभासदास येत्या दीपावलीला ही साखर जवळच्या शेतीगट ऑफिसवर उपलब्ध केली जाणार असल्याचे जाहीर केले.