संस्कृती क्लासेस वाटेगावचे घवघवीत यश ; चार वर्षांत १२१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

वाटेगाव, दि. १ ऑगस्ट | चांगभलं वृत्तसेवा
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण करून त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या संस्कृती क्लासेस, वाटेगाव या नामवंत शैक्षणिक संस्थेने सलग चौथ्या वर्षी घवघवीत यश संपादन केले आहे. गेल्या चार वर्षांत एकूण १२१ विद्यार्थ्यांनी विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश संपादन करत संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.
या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी केली आहे. सानवी घाटगे हिने नवोदय विद्यालयासाठी निवड मिळवली असून तालुका गुणवत्ता यादीत १८वा क्रमांक पटकावला आहे. शर्वरी सुतार हिने तालुक्यात स्कॉलरशिप परीक्षेत तिसरा क्रमांक मिळवून आपले कौशल्य सिद्ध केले आहे, तर प्रतीक्षा पुंदे हिने सहावा क्रमांक मिळवला असून केंद्रीय शिष्यवृत्तीही मिळवली आहे.
केंद्रीय शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी :
श्रावणी आडके
समय भालधरे
प्रतीक्षा पुंदे
सारथी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी:
श्रुती पाटील, शिवम सोजे, राजनंदिनी मुळीक, शिवानी पवार, वैष्णवी उथळे, सायली मुळीक, वेदिका मुसळे, प्रतीक्षा थोरात, चैत्राली खोत, आकांक्षा मुळीक, स्नेहल पाटील, श्रेया पाटील, आदित्य पाटील
या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कष्टातून व संस्थेच्या मार्गदर्शनातून हे यश मिळवले आहे. त्यांचा गौरव करताना प्रमुख पाहुणे प्रदीपकुमार कुडाळकर (शिक्षणाधिकारी, योजना जिल्हा परिषद,सिंधुदुर्ग) यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
या यशामागे संस्थेच्या परिश्रमशील आणि विद्यार्थी-केंद्रित कार्यपद्धतीचा मोठा वाटा आहे. या यशाचे श्रेय संस्थेच्या संचालिका सौ. कोमल नाईकडे यांना जाते. त्यांचे मार्गदर्शन व सातत्याने दिलेला आधार यामुळेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असल्याचे पालकांनी यावेळी नमूद केले.
संस्कृती क्लासेस, वाटेगाव हे केवळ शिकवणी केंद्र नसून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्वप्नपूर्तीचे एक व्यासपीठ बनले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, वेळोवेळी घेतले जाणारे सराव वर्ग, विद्यार्थ्यांवर दिलेले वैयक्तिक लक्ष आणि प्रेरणादायी वातावरण यामुळे संस्थेची घोडदौड सातत्याने सुरू आहे.
कार्यक्रमाला पालक प्रतिनिधी म्हणून राजेंद्र खोत, स्नेहा घाटगे, सुवर्णा सुतार, निकम सर व विशाल नाईकडे यांची उपस्थिती लाभली.