
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
छ. उदयनराजे भोसले महाराज यांच्या विजयामुळे रिक्त झालेली राज्यसभा जागा जिल्हा भाजपाला मिळावी, अशी आग्रही मागणी सातारा जिल्हा भाजपच्यावतीने निवडणूक निरीक्षक तथा माजी आमदार योगेश टिळेकर यांच्याकडे करण्यात आली. सातारा येथे माजी आमदार तथा भाजपाचे निवडणूक निरीक्षक योगेश टिळेकर यांच्यासोबत झालेल्या जिल्हा भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. यावेळी टिळेकर यांनी लोकसभा निवडणूक संदर्भात भाजप कार्यकर्त्या सोबत संवाद साधून सविस्तर केली.
पै. धनाजी पाटील यांनी मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले म्हणून अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला हर्षवर्धन मोहिते यांनी अनुमोदन दिले. कराड शहर अध्यक्ष श्री एकनाथ बागडी यांनी श्रीमंत छ. खा. उदयनराजे भोसले यांच्या लोकसभेतील विजयाबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला . त्याला कराड शहर सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी यांनी अनुमोदन दिले.यावेळी विविध समस्या अनेक कार्यकर्त्यांनी मांडल्या.
जिल्हाध्यक्ष धर्यशील कदम यांनी कराड शहर आणि कराड दक्षिणच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे निवडणुकीत घेतलेल्या परिश्रमाबद्दल कौतुक केले. यावेळी कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी योगेश टिळेकर यांचा सत्कार केला.