
कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
सातारा जिल्हा शिवसेना समन्वयक व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेदसिंह यादव यांचा वाढदिवस सर्व मित्र परिवाराच्या वतीने युवा प्रेरणा दिन म्हणून दरवर्षी मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो. यावर्षी या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन बुधवार 18 व गुरूवार 19 रोजी करण्यात आले असल्याची माहिती राजेंद्रसिंह यादव मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आली.
वाढदिवसाच्या निमित्ताने राजेंद्रसिंह यादव मित्र परिवाराच्या वतीने समाजातील गरीब व गरजूंना मदत होत असते. या बरोबर सुशिक्षीत बेरोजगार तरुणांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. आजपर्यंत या रोजगार मेळाव्यातून कराड शहर व परिसरातील जवळपास पाच हजार युवा-युवतीना नोकर्या प्राप्त झाल्या आहेत.
गेली २५ वर्षे राजेंदसिंह यादव कराड नगरपरिषदेत नगरसेवक, सभापती,उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. गेली दहा वर्षे त्यांच्या नेतृत्वाखाली यशवंत विकास आघाड़ीची सत्ता नगरपरिषदेत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे पर्यटन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्यातून राजेंद्रसिंह यादव यांनी कराड शहराच्या सर्वगीण विकासाची फेज-२ही संकल्पना मांडून ती अस्तित्वात आणली आहे. रस्त्यांचे डांबरीकरण, बंदिस्त गटार, चौकाचे व पुतळ्यांचे सुशोभिकरण, ४२कि.मी.ची पाणीपुरवठा व ५६ कि.मी. ची ड्रेनेज लाईनची कामे, ६ मोठ्या क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या, ४ नवीन पपिंग स्टेशन, समाज मंदिरे, व्यायामशाळा या बरोबर संविधान भवन, अभ्यासिका, कराड शहराच्या विकासासाठी राज्य नगरोत्थान विकास निधीमधून शहरात फेज-२च्या माध्यमातून विविध पथदर्शी विकासकामे सुरु आहेत. तसेच जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या राजेंद्रसिंह यादव यांच्या माध्यमातून डीपीड़ीसीमधून प्राप्त झालेल्या निर्धीतून कराड शहरात विविध विकास कामे सुरू आहेत.
नागरिकांच्या सुविधेसाठी मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय आहे. ते कायम उघडे असते. या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्या सोडविल्या जातात, तसेच नवमतदार नोदणी, बेरोजगार मेळावे, रक्तदान शिबीरे, आधारकार्ड, लाडकी बहीण योजनेची नोंदणी, बांधकाम कामगार मदत, आयुष्यमान भारत कार्ड काढून देणे, उपमुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्ष, संजय गांधी निराधार योजना, पंतप्रधान आवास योजना अशा विविध योजना सातत्याने राबवित आहेत.
स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या विचारावर असलेली श्रद्धा व कराडच्या सर्वगीण विकासाचा ध्यास घेऊन समाजात कार्यरत असलेल्या राजेंद्रसिंह यादव यांच्या यावर्षीच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार 18 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर असे सलग दोन दिवस विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी 18 रोजी यशवंत विकास एकता मॅरेथॉनचे आयोजन सकाळी 7 वाजता दत्त चौक येथे करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता साईबाबा मंदिर, बस स्थानक परिसरात वृक्षारोपण होणार आहे. सकाळी 10 वाजता शिवाजी स्टेडियम अंगणवाडीला शालेय साहित्य वाटप होणार आहे. सकाळी 10.30 वाजता 12 डबरे पाण्याची टाकी येथे सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तर जिल्हा परिषद शाळा मुजावर कॉलनी येथे शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे. सकाळी 11.30 वाजता नगरपालिका शाळा क्रमांक तीनमध्ये महिला स्वसंरक्षण स्पर्धा होणार आहेत. दुपारी 12 वाजता महाराष्ट्र हायस्कूल येथे पुस्तके व शालेय साहित्य वाटप होणार आहे. दुपारी 1 वाजता खराडे कॉलनी येथे अंगणवाडी व आरोग्य सेविका सन्मान सोहळा होणार आहे. 1.30 वाजता गोरक्षणमध्ये गायींना चारा वाटप, दुपारी 4 ते 6 या वेळेत कराड शहरात विविध ठिकाणी विकास कामांची भूमिपूजने मा. राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते होणार आहेत. तर सायंकाळी 6 वाजता नगरपालिका जलतरण तलाव येथे कोल्हाटी वस्तीमध्ये गरजू महिलांना साडी वाटप होणार आहे.
शुक्रवार 19 रोजी सकाळी 8.30 वाजता राजेंद्रसिंह यादव देवदर्शन व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी स्थळी अभिवादन करणार आहेत. सकाळी 8.45 वाजता सात शहीद मारुती मंदिर येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन होणार आहे. तसेच संत तुकाराम हायस्कूलमध्ये संगीत साहित्य वाटप होणार आहे. तर 9.30 वाजता रविवार पेठ पाण्यात टाकी येथे सर्व रोग निदान शिबिराचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 10:30 वाजता नगरपालिका शाळा क्रमांक तीनमध्ये रोजगार मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 11 वाजता नगरपालिका शाळा क्रमांक तीनमध्ये गुणवंत विद्यार्थी शिक्षक आदर्श शाळा पुरस्कार सोहळा व अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे. दुपारी 1 वाजता उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता कीट व फळेवाटप होईल. दुपारी 1.30 बसस्थानक येथे स्टीलची बाके लोकार्पण होणार आहे तर दुपारी 4 ते 9 या वेळेत नगरपालिका शाळा क्रमांक तीनमध्ये राजेंद्रसिंह यादव वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
या सर्व कार्यक्रमांना कराडकर नागरिक व शिवसेना कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक राजेंद्रसिंह यादव मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.