चांगभलं ऑनलाइन | सातारा
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रेची आज मणिपूर मधून सुरुवात होत आहे. हि न्याय यात्रा देशात अन्यायाविरोधात एक लोकचळवळ उभा करेल असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले ते भारत जोडो न्याय यात्रेच्या स्टिकर अनावरण प्रसंगी सातारा येथे आले असता बोलत होते.
आज त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेचे स्टिकरचे अनावरण करीत आपल्या वाहनाला स्टिकर लावून यात्रेमधील आपला सहभाग नोंदविला.
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूर ते मुंबई अशी असणार आहे तसेच हि यात्रा 15 राज्यातून 100 जिल्ह्यातून जवळपास 6500 किमी चे अंतर पार करणार आहे.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या यशस्वीतेनंतर आता राहुल गांधी अन्यायाच्या विरोधात जनआंदोलन उभं करत आहेत यासाठीच त्यांची हि न्याय यात्रा असेल.
आज या न्याय यात्रेची सुरुवात Khongjom या गावातून झाली. यावेळी राहुल गांधींच्या सोबत काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेस चे वर्किंग कमिटी सदस्य, काँग्रेस चे खासदार उपस्थित होते.