चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
रामकृष्ण वेताळ युवा मंच कराड उत्तर यांच्यावतीने बनविण्यात आलेल्या दिनदर्शिका २०२४ या दिनदर्शिकेचे प्रकाशन मोठ्या उत्साहात पार पडले.
या प्रकाशन सोहळ्यासाठी भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस तथा सातारा लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, प्रमोद गायकवाड , तालुकाध्यक्ष शंकरराव शेजवळ, संयोजक महेश जाधव, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, सुरेश कुंभार, किसान मोर्चा लोकसभा समन्वयक सूर्यकांत पडवळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
रामकृष्ण वेताळ युवा मंच कराड उत्तर यांच्यावतीने दिनदर्शिका २०२४ ची निर्मिती करण्यात आली आहे. सर्व सण,यात्रा, वाढदिवस, पंचांग, राशिभविष्य यांच्या माहितीसह लोकांना उपयुक्त दिनदर्शिका बनवण्यात आली असून सदर दिनदर्शिकेचे वितरण कराड उत्तर मतदार संघामध्ये मोफत स्वरूपात केले जाणार आहे.
मागील वर्षी अशा प्रकारची दिनदर्शिका तयार करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी या दिनदर्शिकेची उत्सुकता लोकांना लागून राहिली होती. स्टेशन रोड समोरील कार्यालयात या दिनदर्शिकेचे प्रकाशन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
यावेळी महिला मोर्चा अध्यक्षा सीमा घार्गे, महिला जिल्हा सरचिटणीस दैवशीला मोहिते, दिपालीताई खोत, शितल कुलकर्णी, पूजा साळुंखे, वैशालीताई मांढरे, दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष दीपक खडक, नवीन जगदाळे, विश्वासराव काळभोर, बाळासो पवार, प्रशांत भोसले, सुनील दळवी, विलास घोलप, अनिल पोळ, जयसिंग डांगे, सतीश माने, अक्षय चव्हाण, बाळासाहेब पोळ, बापूराव चौधरी, सुरेश शेडगे, सागर चव्हाण, रणजीत थोरात, दिनेश घाडगे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र मोरे यांनी केले. प्रास्ताविक आणि दिनदर्शिका छापण्यामागची पार्श्वभूमी रामकृष्ण वेताळ यांनी सांगितली. तर आभार तुकाराम नलवडे यांनी मानले. या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याला कराड उत्तर मधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.