पालखी सोहळ्याच्या काळात पालखी मार्गावर पोलीस दलाकडून इतर वाहनांना मनाई आदेश जारी – changbhalanews
Uncategorized

पालखी सोहळ्याच्या काळात पालखी मार्गावर पोलीस दलाकडून इतर वाहनांना मनाई आदेश जारी

सातारा | चांगभलं वृत्तसेवा
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि.२६ ते ३० जून अखेर सातारा जिल्हयातुन मार्गक्रमण करणार असुन सदर पालखी सोहळा पुणे जिल्हयातुन सातारा जिल्हयात दि. २६ जून रोजी पाडेगाव, लोणंद येथे प्रवेश करणार असुन त्यानंतर लोणंद, तरडगांव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करुन 30 जून रोजी सोलापूर जिल्हयात जाणार आहे. पालखी सोहळा हा निरा लोणंद फलटण मार्गे पंढरपुर रस्त्याने जाणार असलेने तसेच पालखी सोहळयात लाखो भाविक सहभागी होणार असल्याने पालखी जाणारे मार्गावर कोणताही अपघात घडू नये, वाहतुक समस्या निर्माण होवू नये तसेच अनुचीत प्रकार घडू नये याकरीता सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पालखी सोहळयातील वाहनांखेरीज व अत्यावश्यक सेवेतील (पोलीस, रूग्णवाहीका, अग्निशामक वाहने) खेरीज करून इतर सर्व वाहनांना निरा लोणंद पंढरपूर मार्गावर 25 ते 30 जून या कालावधीत प्रवेश करण्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३४ प्रमाणे अधिसूचनेने मनाई आदेश जारी केला आहे.

दि.25 जून रोजीचे सकाळी ६ ते २९ जून रोजीचे रात्री २४ वाजेपर्यत फलटण येथून पुणे, निरा, लोणंद कडे जाणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पूणेकडे शिरगांव घाटातून वळविणेत येत आहे.
दि. 25 जून रोजीचे सकाळी ६ ते 28 जून रोजीचे रात्री २४ वाजेपर्यत आदर्की फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळयातील येणारे वाहनाखेरीज इतर वाहनांना बंद करणेत येत आहे.
दि.२५ जून रोजीचे सकाळी ९ पासून ते दि.३० जून रोजीचे १३ वा. पर्यंत लोणंद येथून फलटणकडे जाणारी वाहतूक आदर्की मार्गे फलटणकडे वळविण्यात येत आहे.
दिनांक २५ जून रोजीचे मध्यरात्री ००.०० वा. ते दिनांक २९ जून रोजीचे २४ वा.पर्यंत फलटण ते लोणंद या मार्गावरील वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.
दि.२८ जून रोजीचे मध्यरात्री ००.०० पासून ते दि.३० जून रोजीचे १६ वा. पर्यंत फलटण ते नातेपुते जाणारी वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.
दि.२८ जून रोजीचे मध्यरात्री ००.०० पासून ते दि.३० जून रोजीचे २४ वा. पर्यंत नातेपुते कडुन पुणे बाजुकडे जाणारी वाहतुक माळशिरस, अकलुज येथुन बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे.
दि.२८ जून रोजीचे मध्यरात्री ००.०० पासून ते दि.३० जून रोजीचे १६ वा. पर्यंत नातेपुते कडुन फलटण मार्गे साताराकडे जाणारी वाहतुक शिंगणापुर तिकाटणे मागे दहीवडी-सातारा अशी वळविण्यात येत आहे. नातेपुते कडुन पुण्याकडे जाणारी वाहतुक नातेपुते-दहीगाव-जांब-बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येतआहे.
दि.२८ जून रोजीचे मध्यरात्री ००.०० पासून ते दि.३० जून रोजीचे १४ वा. पर्यंत नातेपुते-वाई-वाठारकडे जाणारी वाहतुक शिंगणापुर तिकाटणे-शिंगणापुर-जायली-कोळकी-झिरणवाडी-चिंचुणी-ढवळपाटी-वाठार फाटा मागे वळविण्यात येत आहे.
दि. २९ जून रोजी पालखी सोहळा हा फलटण येथुन पुढील बरड मुक्कामी सकाळी ०६.०० वा. मार्गस्थ होणार आहे. सदर वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होवु नये महणुन पालखीतील वाहने फलटण ते पंढरपुर रोडने बरडकडे जाण्याऐवजी फलटण दहीवडी चौक-कोळकी शिंगणापूर तिकाटणे-बडले-पिंप्रद बरड अशी वळविण्यात येत आहे.
पालखी सोहळा दरम्यान पालखी मार्गावरील पालखी सोहळयातील वाहनाखेरीज इतर सर्व बाहने पर्यायी मार्गाने ये-जा करतील याची इतर वाहनधारकांनी नोंद घ्यावी असे सातारा जिल्हा पोलीस दलाकडून कळविण्यात आले आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close