महिलांसाठीचा वस्तू प्रदर्शन उपक्रम स्तुत्य : डॉ. अतुल भोसले – changbhalanews
Uncategorized

महिलांसाठीचा वस्तू प्रदर्शन उपक्रम स्तुत्य : डॉ. अतुल भोसले

सुहास जगताप व मैत्री फौंडेशनच्या प्रदर्शनास महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या उद्योगांना चालना देण्यासाठी घेतलेला सुहास जगताप यांचा उपक्रम कौतुकास्पद असून पुढील काळात यापेक्षा देखील मोठे प्रदर्शन घेण्यासाठी आपण सहकार्य करणार आहे. या प्रदर्शनामुळे महिलांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. बचत गटाचे उत्पादन बाजारपेठेपयर्र्त पोहोचवण्याचे साधन या प्रदर्शनाच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादन भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी केले.

माजी नगरसेवक सुहास जगताप व मैत्री फाऊंडेशन यांच्यावतीने गृहउद्योग करणार्‍या महिलांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महिलांनी तयार केलेल्या मालाच्या विक्रीचे प्रदर्शन व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सुहास जगताप, माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्या सौ. स्वाती पिसाळ, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सौ. सारिका गावडे, सौ. साधना राजमाने, सौ. कोमल शिंदे यांची उपस्थिती होती.

सुहास जगताप म्हणाले, स्व. जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. घरबसल्या अनेक महिला खाद्य पदार्थांसह कपडे, ज्वेलरी आदी व्यवसाय करत असतात. बचत गटाच्या महिलाही अनेक छोटे मोठे व्यवसाय करून कुटुुंबाला हातभार लावत असतात. मात्र महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळत नाही पर्यायाने त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी होतो. यासाठी त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रदर्शनामुळे महिलांची यामुळे आर्थिक उन्नती होणार असून महिलांमध्ये आत्मनिर्भरता येणार आहे. गृहिणींना घरात बसून रोजगाराचे साधन मिळणे गरजेचे आहे. पुढील काळातही महिलांची आर्थिक उन्नती होण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहणार आहे.

यावेळी सुमारे 200 स्टॉल सहभागी झाले होते. सर्व महिलांना वाण वाटप करण्यात आले. प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close