शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा शुक्रवारी पारितोषिक वितरण समारंभ
सिनेअभिनेत्री शर्वरी जोग उपस्थित राहणार
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
विद्यानगर तालुका कराड येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि जिमखाना “अभेद्य” 2K24 आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन “अंतरंग” निमित्त वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कुण्या राजाची गं तू रानी फेम (स्टार प्रवाह) सिनेअभिनेत्री शर्वरी जोग यांच्या शुभहस्ते व सातारा येथील शे.चं. मुथा आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडीतराव लोंढे ,
पुणे येथील तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे सहाय्यक संचालक (अतांत्रिक) सुधीर पवार यांचे प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि. २२ मार्च २०२४ रोजी सकाळी ठिक ९.०० वा. उद्घाटन तर सायंकाळी ठिक ६.०० वाजता बक्षीस वितरण समारंभ यशवंतराव चव्हाण स्मृती सदन-टाऊन हॉल, कराड येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
यावेळी शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या जिमखाना अध्यक्ष प्र. प्राचार्य डॉ. रिता दा. चकोले, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. मनोज श्रा. चरडे, नियतकालिका प्रकाशन प्रमुख डॉ. मयुरा अ. काळे ,सांस्कृतिक सचिव अर्चित पाटील , क्रिडा सल्लागार दिलीप आ. कांबळे, विभाग प्रमुख डॉ. अविनाश ह. होसमनी, डॉ. रेमेथ जॅ. डायस, स्पोर्टस् सेक्रेटरी
धिरज चव्हाण , सांस्कृतिक सल्लागार डॉ. इंद्रजीत दा. गोंजारी ,
विभाग प्रमुख डॉ. योगेश वि. परि, जनरल सेक्रेटरी युवराज गवळी तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी सर्व वर्गप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.