पृथ्वीराज चव्हाण नाम ही काफी है – आ. सतेज उर्फ बंटी पाटील – changbhalanews
राजकिय

पृथ्वीराज चव्हाण नाम ही काफी है – आ. सतेज उर्फ बंटी पाटील

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
पृथ्वीराजबाबांनी केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री असताना स्वतःचे घर भरले नाही. मला कराड दक्षिणच्या मातीचा कल स्पष्ट दिसत आहे. कराडच्या भूमीची सेवा करणे हे पृथ्वीराजबाबांचे उद्दिष्ट आहे. हे नेतृत्व आपण जपले पाहिजे. त्यांच्याबद्दल एकच सांगता येईल की , पृथ्वीराज चव्हाण नाम हि काफी है, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केले.

मलकापूर येथे राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. आ. पृथ्वीराज चव्हाण, अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, मनोहर शिंदे, अजितराव पाटील – चिखलीकर, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, नितीन काशिद, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, नीलम येडगे, शंकरराव खबाले, नामदेव पाटील, अॅ ड. नरेंद्र नांगरे – पाटील, शिवाजीराव थोरात, विद्याताई थोरवडे, गीतांजली थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. सतेज पाटील म्हणाले, पृथ्वीराजबाबा महाराष्ट्राच्या नकाशावर झळकले पाहिजेत, ही जबाबदारी कराड दक्षिणच्या जनतेची आहे. त्यासाठी एकत्र ताकद दाखवावी लागेल.. महाराष्ट्रात आज जनता महागाईने त्रस्त आहे. निवडणुकीच्या दोन दिवसात खिडकीतून आणि दारातून अमिष येतील. मात्र अशा आमिषांना बळी न पडता कराड दक्षिणच्या जनतेने पृथ्वीराजबाबांना निवडून द्यावे.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी बोलताना राज्यात सत्ताबदल होऊन नवीन सरकार येणार असून २०१० ते २०१४ या काळात कराड दक्षिणेचा जेवढा विकास झाला , त्याही पेक्षा जास्त विकास होणार असल्याचे सांगितले. कराडच्या एमआयडीसीच्या विस्ताराला मर्यादा असल्याने कराड व मलकापूर येथे आयटी हब करण्याचे माझे स्वप्न आहे., असेही ते म्हणाले.

मनोहर शिंदे म्हणाले, मलकापूर शहराच्या विकासासाठी माजी खा. आनंदराव चव्हाण व प्रेमलाकाकी यांनी मोठे योगदान दिले आहे. मात्र मलकापूरची नगरपरिषद होत असतानाही भाजपच्या मंडळींनी विरोध केला होता.

अॅ ड. उदयसिंह पाटील म्हणाले, विलासकाकांनी मतदारसंघात विकासाचा पाया घातला. पृथ्वीराजबाबांनी हे काम आणखी पुढे नेले. विरोधी मंडळी प्रतिगामी व व्यक्तिकेंद्रित विचाराचे आहेत. ते उद्योगधंद्याच्या नावाखाली समाजाला वेठीस धरत आहेत.

यावेळी कलाकार महासंघाच्यावतीने अनिल मोरे यांनी तर रुग्ण हक्क समितीच्यावतीने उमेश चव्हाण यांनी तसेच विंग येथील हनुमान वॉर्डमधील दीडशे कार्यकर्त्यांनी आ. पृथ्वीराजबाबांना पाठिंबा जाहीर केला.

वन खात्याच्या हद्दीवरून मलकापूरच्या मंडईत जाणारा लोकांचा रस्ता कोणी बंद केला? – मनोहर शिंदे

दहा वर्षात मलकापूरसाठी विरोधकांनी दहा पैसे तरी आणलेत काय? असा सवाल मनोहर शिंदे यांनी उपस्थित केला. त्यांचे हॉस्पिटल धर्मादाय संस्था आहे म्हणून त्यांनी शिक्षण कर आणि व्यवसाय कर माफ करून घेऊन मलकापूर नगरपरिषदेचा सुमारे एक कोटी रुपयाचा कर भरला नाही. वन खात्याच्या हद्दीवरून मलकापूरच्या मंडईत जाणारा लोकांचा रस्ता कोणी बंद केला? हे स्पष्ट सांगा? असेही मनोहर शिंदे म्हणाले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close