कराड विमानतळाचे विस्तारीकरण व नाईट लँडींगची कामे वर्षभरात पूर्ण करण्यास प्राधान्य – पालकमंत्री शंभुराज देसाई – changbhalanews
Uncategorized

कराड विमानतळाचे विस्तारीकरण व नाईट लँडींगची कामे वर्षभरात पूर्ण करण्यास प्राधान्य – पालकमंत्री शंभुराज देसाई

चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
एका वर्षात कराड विमानतळाचे विस्तारीकरण आणि रात्रीच्या वेळी विमान सेवा सुरू करणे. याबाबीला प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन, उद्योग वाढीला चालना मिळणार आहे, असे कराड विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपवनसरंक्षक आदिती भारद्वाज, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, विमानतळ प्राधिकरणाचे विभागीय व्यवस्थापक संतोष नलावडे, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे आदी उपस्थित होते.
कराड विमानतळ विस्तारीकरण व नाईट लॅडींग हा विषय अनेक वर्षापासूनचा प्रलंबित आहे.

2012-13 मध्ये विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्याची असणारी 1 हजार 280 मीटरची धावपट्टी वाढवून ती 1 हजार 700 मीटर करण्यात येणार आहे.
विस्तारीकरणासाठी 48 हेक्टरचे भूसंपादन झाले आहे. जवळपास 62 टक्के खातेदारांना भूसंपादन पोटी मिळणारा निधी शासनाने वितरीत केला आहे. उर्वरित खातेदारांना पंधरा दिवसांची नोटीस देवून भूसंपादनाची भरपाई स्विकारण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.

भरपाईची रक्कम न स्विकारल्यास रकमेचा भरणा कोर्टात करण्यात येवून जमीन ताब्यात घेण्यात येईल व संपादित जमिनीस लवकरात लवकर शासनाचे नाव लावण्याच्या कामास प्राधान्य देण्याचा निर्णय पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीत झाला.

यावेळी एअरपोर्ट ॲथोरिटी ऑफ इंडिया यांनी निर्धारित केलेल्या नियमानुसार जी बांधकामे, टॉवर्स अडथळा निर्माण करणारी ठरतील ती अतिक्रमणे काढण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देशही या बैठकीत पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close