शेरे गावचा अभिमान! सौ. नीलिमा चव्हाण यांचा राज्यस्तरीय गौरव!

कराड प्रतिनिधी, दि. 25 | चांगभलं वृत्तसेवा
रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव श्रीपतराव कदम विद्यालय, शिरसगाव सोनसळ येथे लेखनिक पदावर कार्यरत असलेल्या आणि शेरे (ता. कराड) येथील रहिवासी असलेल्या सौ. नीलिमा गणेश चव्हाण यांना ‘अहिल्यारत्न’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
हा पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्ताने अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, धोंडेवाडी ( कराड) यांच्या वतीने देण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे निस्वार्थ योगदान आणि सामाजिक कामातील सक्रिय सहभाग या कारणांमुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
पुरस्कार वितरण माजी आमदार रूपवनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सौ. नीलिमा चव्हाण यांच्या कार्याची प्रशंसा करत उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या सन्मानामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये तसेच शाळा व गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, परिसरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
📎चांगभलं न्यूजला सोशल मीडियावर फॉलो करा!
🕊️ X (Twitter):
Follow करा 👉 @ChangbhalaNews
📢 ताज्या अपडेट्स, व्हायरल थ्रेड्स आणि ब्रेकिंग न्यूजसाठी!
📸 Instagram:
Follow करा 👉 instagram.com/changbhala.news?igsh=cTQwMzB3ZXBoOHpu
🎥 ग्राउंड रिपोर्ट्स, रील्स आणि बातम्यांचे व्हिज्युअल कव्हरेज – फक्त Instagram वर!
📘 Facebook:
Like करा 👉 facebook.com/profile.php?id=61552122239763
📲 तुमच्या परिसरातील लाईव्ह अपडेट्स, थेट प्रसारण आणि विशेष बातम्यांसाठी आम्हाला Facebook वर Like करा!
📌 #ChangbhalaNews – तुमच्या गावाची, तुमच्या मनातली बातमी