कराड येथील कृषी प्रदर्शनाच्या तयारीला वेग
जिल्हाधिकारी घेणार आढावा : दोन टनाचा रेडा ठरणार आकर्षण
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन प्रतिवर्षी प्रमाणे दिनांक २४ ते २८ नोव्हेंबर अखेर भरत असून प्रदर्शनाची तयारी वेगात सुरू आहे.
सोमवार दि २० रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे प्रमुख उपस्थितीत सर्व शासकीय विभागाची आढावा बेठक होणार असून त्यामध्ये प्रदर्शनाच्या तयारीचा व नियोजनाचा आढावा घेतला जाणार आहे.
शनिवारी प्रदर्शनाच्या तयारीचा व पार्किंग नियोजनाबाबत
रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अँड उदयसिंह पाटील,कराड शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यवंशी,यांनी प्रदर्शन तयारीचा आढावा घेतला.यावेळी माजी जि प प्रदीप पाटील, बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम, प्रभारी सचिव आबासो पाटील प्रा धनाजी काटकर,दीपक पिसाळ,राजेंद्र पाटील, डायनामिक इव्हेंटचे मॅनेजर निरज तिवारी,सचिन पाटील उपस्थितीत होते.
पिलरलेस डोमची उभारणी अंतिम टप्प्यात आली असून हे डोम वॉटर फ्रुप असणार आहेत. त्यामध्ये एकूण ४०० स्टॉल्स या बरोबर स्वतंत्र पशु-पक्षी दालन, आरोग्य विभागाचे विशेष दालन तसेच नविन तंत्रज्ञान युक्त स्टॉल असणार आहेत. उंची मंडपामुळे मंडपात हवा खेळती राहणार आहे. मंडप व परिसरात सर्व सोई सुविधा कशा असणार आहेत याबरोबर पार्किंग जागा,मुख्य मंडप प्रवेशद्वार यांची ही पाहणी करून योग्य सूचना देण्यात आल्या.
दोन टन वजनाच्या गजेंद्रचे आकर्षण
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी.प्रदर्शनात गजेंद्र नावाचा दोन टन वजनाचा रेडा पशु प्रदर्शनात सहभागी होणार असल्याने त्याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
बेळगांव येथील ज्ञानदेव नाईक यांचा हा रेडा असून त्याचे वजन २ टन असल्याने त्याचे नांव त्यांनी गजेंद्र ठेवले आहे. अनेक प्रदर्शनात हा रेडा सर्वाचा कुतूहल व आकर्षणाचा विषय राहिला आहे. या रेड्याचा प्रतिदिनी २५०० ते ३००० हजार इतका खर्च असून रोज ५ किलो सफरचंद , गव्हाचा आटा, आणि काजूचा खुराक दिला जातो. या गजेंद्रने महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक प्रदर्शन गाजवली असून दीड कोटी रुपयांची मागणी या रेड्याला आली होती. हा रेडा कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात दाखल होत असून याबरोबत अनेक पशु पक्षी या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. या रेड्याला बघण्यासाठी स्वंतत्र व्यवस्था केली असून गजेंद्रची सर्वानाच उत्सुकता लागून राहिली आहे.