प्रवीणकुमार त्यागी यांना जीवनगौरव तर संजयकाका पाटील यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान
कराडमध्ये रंगला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
ऑलिंपिक राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समिती, हॉकी लिजंड, पद्मश्री मेजर ध्यानचंद पुरस्कार समिती, मन अभिमान विकास फाउंडेशन महाराष्ट्र आणि कालीरमण फाउंडेशन इंडिया, यांच्यावतीने हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंना महाराष्ट्र क्रीडा रत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी 1964 चे ऑलिंपियान बंडामामा पाटील रेठरेकर, हिंद केसरी दिनानाथ सिंह अण्णा, युवा नेते साहिल शशिकांत शिंदे, अजय साळुंखे साहेब, दीपकशेठ लोखंडे यांच्या हस्ते तसेच प्रा विनोद कदम, प्रा. अरुण पिसाळ श या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कारमूर्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रवीणकुमार त्यागीसर ( दिल्ली) यांना जीवनगौरव, संजयकाका पाटील (इस्लामपूर) यांना महाराष्ट्र गौरव, वसंतराव पाटील यांना महाराष्ट्र क्रीडारत्न तर डॉ. आशुतोष जयवंत जाधव यांना युवारत्न तर प्रा. दीपक तडाखे यांना कलारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संपूर्ण देशातून आलेल्या 75 वरून अधिक खेळाडूंचा, क्रीडा मार्गदर्शकांचा, क्रीडा संघटक चा आणि विविध विभागामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
कर्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा नितीन शिंदे, क्रीडा मार्गदर्शक सुहास कारेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा. दीपक तडाखे यांनी केले. सदरचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण स्मृति सदन कराड या ठिकाणी पार पडला.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सुवर्णपदक विजेते प्रा. पै. अमोल साठे सर यांनी केले.