आदरणीय पी डी पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त सह्याद्री साखर कारखान्याकडून महादेव डोंगरावर वृक्षारोपण
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड उत्तरचे भाग्यविधाते, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आदरणीय स्व.पी. डी. पाटीलसाहेब आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिनाचे औचित्य साधून, सह्याद्रि सहकारी साखर कारखाना, ग्रामपंचायत यशवंतनगर व वन विभागाच्या वतीने राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील, संचालक मंडळ व मान्यवरांच्या उपस्थितीत कारखानानजीकच्या महादेव डोंगर उतारावर आज वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी कारखान्याच्या व्हा. चेअरमन सौ. लक्ष्मीताई गायकवाड, सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, जशराज पाटील (बाबा), माणिकराव पाटील, लालासाहेब पाटील, डी. बी. जाधव, रामदास पवार, अविनाश माने, रामचंद्र पाटील, सर्जेराव खंडाईत, पांडुरंग चव्हाण, लहुराज जाधव, संजय कुंभार, जयवंत थोरात, सौ. शारदा पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, वनक्षेत्रपाल प्रादेशिक तुषार नवले, वनरक्षक वाघेरी सानिका घार्गे, वनरक्षक हेळगांव मानसी निकम, वनरक्षक किवळ पूजा परुले तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी, सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कारखान्याचे संस्थापक आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब याचे धोरणानुसार प्रती वर्षी कारखाना परिसरामध्ये वृक्षारेापण करण्यात येते. कारखान्याचे विद्यमान चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना मालकीच्या जवळपास 20 एकर क्षेत्रावर अनेक प्रकारची झाडे लावून ती उत्तमप्रकारे जोपासल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने प्रथम क्रमांकाचा वनश्री पुरस्कार देवून यापूर्वी कारखान्याचा गौरव केलेला आहे. तद्नंतर वृक्षारेापणासाठी राज्यशासनाकडून कारखान्यास मिळालेल्या महादेव डोंगरावरील 44 हेक्टर क्षेत्रापैकी 15 हेक्टर क्षेत्रावर गतवर्षी 5000 रोपांची लागण केलेली असून, त्यासाठी वनतळे बांधून ठिबक सिंचन संचाने पाण्याची व्यवस्था करून सदरच्या रोपांची जोपासना करण्यात आलेली आहे.
यंदाही विविध जातींच्या 500 रोपांची लागण करण्यात असून, त्यासाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.