नांदगावात मुळिकवाडी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण सुरु
खासदार श्रीनिवास पाटील यांची शिफारस; राज्य शासनाच्या पंचवीस-पंधरा योजनेतून निधी मंजूर
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
नांदगाव (ता.कराड) येथील मुळीकवाडी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली होती. हा रस्ता मजबूत व्हावा म्हणून खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शिफारसीनुसार शासनाच्या २५-१५ योजनेतून या रस्त्याचे मजबुतीकरण, खडीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्याबद्दल ग्रामस्थांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.
ग्रामपंचायत सदस्य प्रशांत विश्वनाथ सुकरे यांनी ज्येष्ठ नेते वि.तु. सुकरे( गुरुजी) यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे या रस्त्याचे काम व्हावे म्हणून पाठपुरावा केला होता. त्यानुसार खा.श्रीनिवास पाटील यांच्या शिफारशीनंतर याला निधी मंजूर झाला असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान या कामाच्या शुभारंभ प्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती पाटील, सयाजी शिंदे, सतीश कडोले, रणधीर शिंदे, जगन्नाथ पाटील, सुरेश जठार, संपत उमरदंड, अनिल जुजार, दिलीप मोरे, रामचंद्र थोरात, श्रीरंग देसाई, विलास माटेकर, संभाजी पाटील, मधुकर पाटील, दीपक पाटील, प्रभाकर देसाई, विश्वास पाटील, पांडुरंग आवळे, प्रणित कुचेकर, रोहित मुळीक, शंकर पाचंगे, वसंत साळुंखे, राजाराम पाटील, रघुनाथ शिंदे, सोनाप्पा पाटील, धनाजी पाटील, शिवाजी पाटील, सिद्धराम शिंदे, धनाजी ठोके, संभाजी पाचंगे, सचिन जठार, संजय तलबार, शुभम पाटील, देवराज पाटील, यशराज देसाई आदी ग्रामस्थांसह ठेकेदार शिंदेची उपस्थिती होती.
नांदगाव पेठ विभागालगत मुळीकवाडी वस्ती परिसरात लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. मात्र याकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब होता. या रस्त्यावर खासदार पाटील यांच्या पाठपुराव्याने प्रथमच निधी मिळून रस्ता मजबुतीकरणाचे काम प्रत्यक्ष सुरू झाल्याने ग्रामस्थांच्यातून त्यांना धन्यवाद दिले जात आहेत.