कराड विमानतळावरून लवकरच प्रवासी विमानांची उड्डाण होईल – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ ; कराडला भाजपचे जिल्हा कार्यकारणी अधिवेशन – changbhalanews
राजकिय

कराड विमानतळावरून लवकरच प्रवासी विमानांची उड्डाण होईल – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ ; कराडला भाजपचे जिल्हा कार्यकारणी अधिवेशन

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराडच विमानतळाच्या विस्तारवाढीसाठी 48 हेक्टर जागेचे भूसंपादन करणे आवश्यक होते. त्यापैकी 38 हेक्टचे संपादन झाले असून उर्वरित 10 हेक्टर संपादन होणे बाकी आहे. येत्या 10-15 दिवसांत ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर पुढची कार्यवाही होईल आणि अवघ्या काही महिन्यांत कराड विमानतळावरून प्रवासी विमान उड्डाण घेईल, असा विश्वास केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

येथील प्रतिसंमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, राज्य कार्यकारणी सदस्य व सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, कराड उत्तर निवडणूक प्रभारी व भाजप नेते मनोज घोरपडे, लोकसभा संयोजक रामकृष्ण वेताळ, विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री मोहोळ म्हणाले, कराड विमानतळ प्रवासी विमानांसाठी सुरू झाल्यास पश्चिम महाराष्ट्रासह सातारा व सांगली जिल्ह्याची लोकांची चांगली सोय होईल. किमान 70 प्रवासी असलेले विमान येथून उड्डाण घेऊ शकेल. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न आहोत.

मनोज जरांगे-पाटील हे राज्यभरात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलने करीत आहेत , याबाबत बोलताना मंत्र मोहोळ म्हणाले , यात काहीही चुकीचे नाही. 2014 ते 2019 दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची भूमिका घेतली. तसा निर्णय घेऊन दहा टक्के आरक्षणही दिले. ते पुढे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातही टिकले. मात्र दुर्दैवाने महाविकास आघाडीला ते टिकवता आले नाही.

भाजपच्या अधिवेशनाबाबत बोलताना मंत्री मोहोळ म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्यभरात भाजपचकडून जिल्हानिहाय अधिवेशनने घेतली जात आहेत. त्या-त्या जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी, तसेच विधानसभेची पूर्व तयारीसाठी हे अधिवेशने महत्वाची आहेत. त्या त्यानुसारच कराडमध्ये अधिवेशन घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, यशवंतराव चव्हाण हे देशाचे मोठे नेते होते. त्याने दूरदृष्टीने अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे कराडला आल्यानंतर त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्याचे मंत्री मोहोळ यांनी आवर्जून सांगितले.

दरम्यान, शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृति सदनात भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा विस्तारीत जिल्हा कार्यकारणी अधिवेशनाचे उद्घाटन मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाने व दीप प्रज्वलन करून महाराष्ट्र गीत गायनाने झाले. प्रथम उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी शोक प्रस्ताव मांडला. जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी प्रास्ताविक केले. रामकृष्ण वेताळ यांनी राजकीय ठराव मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकारच्या अभिनंदनचा ठराव करण्यात आला. विठ्ठल बलशेटवार व सागर शिवदास यांनी अनुमोदन दिले.

उद्घाटनपर भाषणात मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. केंद्र व राज्याचा अर्थसंकल्प आणि त्यामधील विविध घटकांना उपयुक्त असणाऱ्या योजनांच्यावर डॉक्टर अतुल भोसले यांनी सविस्तर विवेचन केले. या योजना सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी व त्याच्या जनजागृतीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले. निवडणूक व्यवस्थापन या विषयावर माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी मुद्देसूद मांडणी केली. तर पक्ष संघटनेची बांधणी कशी करावी याबाबत आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी सविस्तरपणे सांगितले. भाजपचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील यांनी आभार मानले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close