‘मुंबई-लंडन-मुंबई’ असा मोटारसायकलवरून दुहेरी प्रवास करून करून कराडात आला युवक!
श्नी शिवाजी उद्यान ग्रुप व सौरभ पाटील मित्र मंडळाकडून झाला सत्कार

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
“मुंबई-लंडन-मुंबई” असा मोटारसायकल वरून दुहेरी प्रवास करून भारतात आलेले योगेश बबनराव आलेकरी यांचा कराड शहरात श्री शिवाजी उद्यान ग्रुप व सौरभ पाटील मित्र परिवार यांचे वतीने “मी आणि यशवंतराव” हे पुस्तक, शाल, श्रीफळ देऊन माजी नगरसेवक सौरभ पाटील यांनी सत्कार केला.
यावेळी माजी नगरसेवक विनायक पावसकर, माजी नगरसेवक विजय वाटेगावंकर, जेष्ठ वृक्षमित्र चंद्रकांत जाधव, बाळासाहेब मोहिते आदी उपस्थित होते.
योगेश आलेकरी यांनी “मुंबई-लंडन-मुंबई” या प्रवास यात्रेमध्ये मोटारसायकलवरून एकुण २७ देशांमधून सुमारे २९ हजार कि मीहून जास्त प्रवास १३१ दिवसांत पुर्ण केला आहे. ते नुकतेच कराड शहरामध्ये दाखल झाले आहेत. सत्कारानंतर योगेश यांनी आपल्या या अभूतपूर्व प्रवासाचे रोचक अनुभव सर्वांना सांगितले. अतिशय खडतर असा हा प्रवास असून तो एकट्याने यशस्वीपणे पुर्ण करणारे भारतीय व महराष्ट्रातील ते एकमेव आहेत. योगेश यांचे आई-वडील शेतकरी असून अतिशय सर्वसामान्य कुटंबातील या युवकाने फक्त अभ्यास, जिद्द आणि निडर वृत्तीच्या स्वभामुळे हा अशक्यप्राय वाटणारा प्रवास पुर्ण केला. हा प्रवास त्यांनी रॉयल एनफिल्ड हिमालयन या मोटरसायकल वरून केल्याचे सांगितले.
रॉयल एनफिल्ड हिमालयन मोटरसायकलचे आकर्षण…
या सत्कार प्रसंगी योगेश आलेकरी यांच्या समवेत त्यांची रॉयल एनफिल्ड हिमालयन मोटरसायकल होती. ती सर्वांचेच आकर्षण ठरली. अनेकांना तिच्या समवेत स्वतः चे फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. ही मोटरसायकल सर्वांचेच आकर्षण ठरली.