उंब्रज येथील रोजगार मेळाव्यात एक हजारावर युवक-युवतींची नोंदणी ; युवकांनी दिले भाजप नेत्यांना धन्यवाद
चांगभलं ऑनलाइन | उंब्रज प्रतिनिधी
रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन , मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत उंब्रज तालुका कराड येथे आयोजित भव्य रोजगार मेळाव्यात एक हजारावर युवक युवतींनी नोंदणी केली. पात्र अनेक युवक-युवतींना या मेळाव्याद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध झाली.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उंब्रज विभागात युवक आणि युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत, या हेतूने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष धर्यशील कदम, कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे, महेश जाधव, शंकरराव शेजवळ , व इतर सर्व पदाधिकारी यांनी उंब्रज येथे या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते.
दरम्यान, या मेळाव्याच्या आयोजनाबद्दल उंब्रज आणि परिसरातील युवकांच्याकडून भाजपाचे नेते धैर्यशील कदम, मनोज घोरपडे आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देण्यात आले आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुरेशतात्या पाटील, कराड-उत्तर मंडल अध्यक्ष शंकरराव शेजवळ, कराड-उत्तर विधानसभा संयोजक महेश जाधव, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कराड-उत्तर अध्यक्षा दिपालीताई खोत, कराड-उत्तर महिला अध्यक्ष सीमाताई घार्गे, कराड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र चव्हाण, दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक खडंग, भटक्या विमुक्त जाती जमाती जिल्हाध्यक्ष विलास आटोळे, कराड शहर मंडल अध्यक्ष एकनाथ बागडी, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भारत जंत्रे, कराड-उत्तर मंडल उपाध्यक्ष हणमंतराव शिंदे, सूर्यकांत पडवळ, कराड-उत्तर किसान मोर्चा अध्यक्ष प्रशांत भोसले, अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस राज सोनावले, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम विजापुरे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा प्रतिभा कांबळे, कराड-उत्तर अनुसूचित जाती जमाती मोर्चा सरचिटणीस दिनेश बैले, पंचायत समिती सदस्य सातारा संजय घोरपडे, सरचिटणीस निलेश भंडारे, दत्तात्रय साळुंखे, कराड उत्तर कामगार मोर्चा अध्यक्षा मीनाक्षी पोळ, युवा उद्योजक जयवंत जाधव, कराड-उत्तर सरचिटणीस तुकाराम नलवडे, ऍडव्होकेट विशाल शेजवळ, माजी ग्रामपंचायत सदस्य उंब्रज विजय कुरकुटे, अमोल थोरात, सोमनाथ थोरात, दिगंबर भिसे पाटील, अरुण नलवडे, प्रशांत देशमुख, गणेश गायकवाड उपस्थित होते.
प्रास्ताविक शंकरराव शेजवळ यांनी केले. सुत्रसंचालन जितेंद्र मोरे यांनी तर प्रतीभा कांबळे यांनी आभार मानले.