चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
पळून जावून लग्न करायला मदत केल्याच्या कारणावरून एकाचा खून केल्याप्रकरणी हजारमाची येथील तिघांना कराड पोलिसांनी अटक केली आहे. जर्नादन महादेव गुरव (वय 49, रा. राजमाची ता. कराड) असे खून झालेल्याचे नाव आहे.
तर तर विकास पाडळे, बाबासाहेब पवार, विनायक चंदुगडे सर्व (रा. हजारमाची ता. कराड) अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. पोलिसांकडील माहिती अशी, राजमाची परिसरातील एकाला पळून जावून लग्न करण्यासाठी मदत केल्याचा राग धरून तिघांनी बेदम मारहाण करुन त्याचा खून केला. ही घटना राजमाची गावच्या हद्दीत सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. जर्नादन महादेव गुरव (वय 49, रा. राजमाची ता. कराड) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर विकास पाडळे, बाबासाहेब पवार, विनायक चंदुगडे सर्व (रा. हजारमाची ता. कराड) अशी या खूनप्रकरणी पोलीस कोठडी मिळालेल्यांची संशयीतांची नावे आहेत.