श्री बाबीर स्वामी देवाच्या यात्रेनिमित्त उद्यापासून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
चांगभलं ऑनलाइन | आटपाडी प्रतिनिधी
होलार समाज, बाबीर स्वामी नगर व समस्त ग्रामस्थ घरनिकी ता.आटपाडी जि.सांगली यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री बाबीर स्वामी देवाची यात्रा दि. 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान साजरी होत असून यानिमित्त धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातील घरनिकी येथील श्री बाबीर स्वामी देवाची यात्रा ही सांगली जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या यात्रेला मोठी धार्मिक परंपरा आहे. यात्रेत पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह श्री बाबीर स्वामी भक्त मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. यावर्षी शुक्रवार दि. 25 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6:00 वा. देवाचं घट बसवण्यात आले आहेत.
तीन दिवस चालणारे या यात्रेत शनिवार दि. 2 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6:00 वा.अभिषेक करण्यात येईल. सकाळी 9: 00 वा.देवाची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
सायंकाळी 7:00 ते 10:00 वा. श्री महालक्ष्मी निलाताई कला मंच पोतराज पार्टी, घरनिकी ता.आटपाडी जि.सांगली, प्रोप्रा. गुरुवर्य श्री सुनिल भिमराव तोरणे यांचा पोतराज गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
रविवार दि.3 नोव्हेंबर 2024 सकाळी 8:30 वा. प्रथेप्रमाणे बकरी वाजवत नेण्यात येतील. दुपारी 2:30 वा. देवाची कर तोडण्यात येईल. दुपारी 3:15 वा. देवाची पालखी गावाकडे येईल. सायंकाळी 6 ते 10 वा. लता लंका लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर दि.4 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 3 वा. लोकनाट्य तमाशा कार्यक्रम होईल. तरि याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी व यात्रेत सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन बाबीर स्वामी देवाचे पुजारी श्री सुनिल भिमराव तोरणे तसेच अध्यक्ष – होलार समाज घरनिकी व श्री बाबीर स्वामी यात्रा कमिटी यांच्यावतीने करण्यात आले आहे.