Uncategorized
आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त अतुलसंस्कार सुंदर हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड दक्षिणचे कार्यकुशल आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “अतुलसंस्कार” या उपक्रमाअंतर्गत बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन श्री प्रशांतदादा मोहिते मित्र परिवार बेलवडे बुद्रुक यांच्यावतीने करण्यात आले होते.
या उपक्रमात ब्रह्मदास विद्यालयाच्या व जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या प्रसंगी प्रशांतदादा मोहिते, उदयसिंह मोहिते, विलास मोहिते, धनाजी मोहिते, हणमंत मोहिते , पै. सुहास जाधव, नितीन मोहिते, विजय मोहिते, नितीन मोहिते, महादेव मोहिते, पोपटसर, जि.प व ब्रम्हदास विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.