मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त उंब्रजच्या नेत्रचिकित्सा शिबिरात 600 जणांना चष्मे वाटप

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड उत्तर मधील मनोजदादा घोरपडे युवा मंच यांच्यावतीने मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, दिनांक 19 रोजी उंब्रज येथे झालेल्या मोफत भव्य नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शिबिरात 600 जणांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना चष्मे वाटप करण्यात आले. तर 90 जणांची शस्त्रक्रियेसाठी नाव नोंदणी करण्यात आली.
यावेळी एच.व्ही. देसाई हॉस्पिटलच्या प्रोजेक्ट मॅनेजर डॉ. कदम , माजी जि. प. सदस्य संपतराव जाधव, उंब्रज गावचे विद्यमान सरपंच योगिराज जाधव, भारतीय जनता पक्षाचे कराड उत्तर संयोजक महेशबाब जाधव, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष दिगबर भिसे, ओ बी सेल सातारा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम विजापुरे , शहाजी मोहिते , ग्रामपंचायचे सदस्य विलासराव आटोळे, चेअरमन जयवंत जाधव, संचालक जयवंत जाधव, ऍड. विशाल शेजवळ, नाना देशमुख, दीपक खड्डग, महेशकुमार डुबल, अनिल माने, सचिन कमाने, सुधीर शेळके, उंब्रज ग्रामपंचायचे सदस्य किसन माळी, उंब्रज ग्रामपंचायचे सदस्य विजयराव जाधव, भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मीनाक्षी जाधव, सौ. प्रतिभाताई कांबळे, वनिताताई माने ,अमोल थोरात आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.