Uncategorized
सातारा सिंचन विभागात नवीन नेतृत्व! अभय काटकर यांची अधीक्षक अभियंता पदावर नियुक्ती

सातारा-कोयनानगर | चांगभलं वृत्तसेवा
राज्य जलसंपदा विभागात फेरबदलाचे वारे! सातारा सिंचन विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या पदावर मोठा बदल करण्यात आला असून, श्री. अभय गोविंद काटकर यांची नवी नियुक्ती करण्यात आली आहे.
याआधी या पदावर कार्यरत असलेले अरुण नाईक यांची पदोन्नती होऊन मुख्य अभियंता म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी काटकर यांची वर्णी लागली आहे. विशेष बाब म्हणजे, अभय काटकर यांनी यापूर्वी याच विभागात सहायक अधीक्षक अभियंता म्हणून काम केलेले असून, त्यांना विभागाचा चांगलाच अनुभव आहे.
ते सध्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे येथे अधीक्षक अभियंता या पदावर कार्यरत होते.
कोयना धरणासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर ही नेमणूक सातारा जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.