जयंत पाटील अजूनही प्रदेशाध्यक्षच? जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटमुळे राष्ट्रवादीच्या खांदेपालटावर नवा ट्विस्ट! – changbhalanews
राजकियराज्य

जयंत पाटील अजूनही प्रदेशाध्यक्षच? जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटमुळे राष्ट्रवादीच्या खांदेपालटावर नवा ट्विस्ट!

मुंबई, दि. १२ जुलै | चांगभलं वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)मध्ये झालेल्या संभाव्य नेतृत्वबदलाच्या चर्चांवर आता पक्ष प्रवक्ते आणि आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवरून ( ट्विटरवरून ) प्रतिक्रिया दिली आहे.

“मा. जयंत पाटील साहेब हेच प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारित होणे, हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार आणि शिस्तीनुसारच चालतो,” असे ट्विट करत आव्हाड यांनी माध्यमांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

या ट्विटमुळे, जयंत पाटील यांनी पद सोडल्याच्या वृत्तावर अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे. कारण, शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याचे वृत्त कालपासून चर्चेत आहे. मात्र, पक्षाकडून याबाबत अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

आव्हाडांच्या या प्रतिक्रियेवर राजकीय वर्तुळात पुन्हा नवे प्रश्न निर्माण झाले असून, ‘खरोखरच खांदेपालट झाला आहे की हे राजकीय रणनीतीचा भाग आहे?’ असा सूर सध्या सोशल मीडियावर उमटत आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close