नॅशनलिस्ट काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाला “या” कारणासाठी भारत निवडणूक आयोगाची परवानगी
चांगभल ऑनलाइन | मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेकडून ऐच्छिक योगदान स्वीकारण्याची नॅशनलिस्ट काॅग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार पक्षाने केलेली मागणी भारतीय निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.
लोकांकडून ऐच्छिक योगदान स्वीकारण्याच्या उद्देशाने या पक्षाने, पक्षाची स्थिती नोंदवणारी माहिती/प्रमाणपत्र जारी करण्याची विनंती आयोगाला केली होती. भारत निवडणूक आयोगाने आपल्या दि.8 जुलै 2024 रोजीच्या पत्रात, लोकप्रतिनिधीत्व कायदा, 1951च्या कलम 29 ब आणि कलम 29 क नुसार ‘सरकारी कंपनी व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीने स्वेच्छेने देऊ केलेले कोणतेही योगदान स्वीकारण्यासाठी’ या पक्षाला अधिकृत केले आहे.
नॅशनलिस्ट काॅग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील 8 सदस्यीय शिष्टमंडळाने आज आयोगाची निर्वाचन सदन येथे भेट घेतली.