कराडला सोमवारी, 29 एप्रिलला नरेंद्र मोदींची सभा
समाजातील विविध घटकांतील लोकांच्या हस्ते सभामंडपाचे भूमिपूजन
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
29 एप्रिल 2024 सोमवार रोजी कराड येथे सातारा लोकसभा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांची महाविराट सभा संपन्न होणार आहे.
या सभेसाठी उभारण्यात येत असलेल्या भव्य मंडपाचे भूमिपूजन समाजातील विविध घटकातील लोकांकडून श्रीफळ वाढवून करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सातारा जिल्ह्यातील प्रचार सभा निश्चित झाली आहे. सोमवारी 29 एप्रिलला पंतप्रधान कराड तालुक्यातील कराड ओगलेवाडी मार्गानजीक सैदापुर येथे बीज गुणन केंद्र कृषी विभाग डेपो या मैदानावर प्रचार सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.
या सभेसाठी सैदापुर परिसरात या सभेसाठी जय्यत तयारी केली जात आहे. या सभास्थळी 35 एकराच्या विस्तीर्ण जागेवरती सभामंडप उभारण्याचे काम सुरू झाले आहे.
या सभेसाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे भूमीपूजन आज करण्यात आले. १ लाख लोकांची बैठक व्यवस्था या मंडपात करण्यात येणार आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, प्रदेश सदस्या स्वाती पिसाळ, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, वर्धन ऍग्रोचे कार्यकारी संचालक विक्रम कदम, जिल्हा सरचिटणीस सागर शिवदास, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे, कराड दक्षिण मंडल अध्यक्ष धनाजी पाटील, मुकुंद चरेगावकर, सुहास जगताप, उमेश शिंदे, नितीन वास्के, घनशाम पेंढारकर, कराड उत्तर मंडल अध्यक्ष शंकर शेजवळ, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कराड उत्तर महिला अध्यक्ष सिमा घार्गे, मंजिरी कुलकर्णी, तुकाराम नलवडे, मोहनराव जाधव, शहाजी मोहिते, सुदर्शन पाटसकर, भारत जत्रे, निशा खिलारे,नितीन खिलारे,नेताजी वाडकर,राणी वाडकर, दादासो साठे, नंदना साठे, बाळासाहेब बागडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.