सौ.रजनीदेवी श्रीनिवास पाटील यांचे निधन – changbhalanews
Uncategorized

सौ.रजनीदेवी श्रीनिवास पाटील यांचे निधन

आज सायंकाळी कराड येथे होणार अंत्यसंस्कार

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी श्रीनिवास पाटील (वय ७६) यांचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी सहा वाजता कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सौ.रजनीदेवी पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पुणे येथे उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सौ. रजनीदेवी पाटील यांचा २६ जुलै १९४८ रोजी जन्म झाला. त्यांचे मूळ गाव सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथील आहे. चार पिढ्यांची सैनिकी परंपरा असलेल्या बर्गे कुटूंबातील त्यांचा जन्म आहे. त्यांचा विवाह १६ मे १९६८ रोजी खा.श्रीनिवास पाटील यांच्याशी झाला. खा. श्रीनिवास पाटील यांना त्यांच्या प्रशासकीय, राजकिय व सामाजिक जीवनात त्यांनी मोलाची साथ दिली. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी सहा वाजता कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

‘माई’ नावाने ओळख….
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांना भक्कम साथ देणाऱ्या सौ. रजनीदेवी पाटील यांचा ‘माई’ या नावाने सर्वांना परिचिय होता. आदर्श संस्कारित आणि एक धार्मिक गृहिणी म्हणून अशी त्यांची ओळख होती. उच्चशिक्षित असलेल्या माईंना आपल्या धार्मिक रूढी परंपरा, संस्कृती यांचा आदर होता. त्यांनी तो प्रयत्न पूर्वक जपला. त्यांचा स्वभाव प्रेमळ होता. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close