तो मोबाईल कराडच्या रिक्षा चालकाला सापडला, पुढे काय झालं… – changbhalanews
Uncategorized

तो मोबाईल कराडच्या रिक्षा चालकाला सापडला, पुढे काय झालं…

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
दिनांक 16/02/2024 रोजी अशोक राजाराम लाड राहणार कुंडल यांचा कराड बस स्टॅण्ड परिसरात मोबाईल हरवला होता. दरम्यान, बस स्टॅण्ड परिसरात रिक्षा चालक संतोष दिलीप ताटे हा त्याचे रिक्षा मधील प्रवासी सोडणे करीता बस स्टॅण्ड परिसरात आला असता त्यास रस्त्यावर एक मोबाईल पडलेला दिसला. तो मोबाईल त्याने धर्मवीर संभाजी रिक्षा गेड कराड संघटनेचे अध्यक्ष फिरोज कच्ची यांचेकडे देवुन त्यांनी सदर मोबाईल मधील आलेल्या शेवटच्या फोन नंबरवरुन संपर्क करुन मोबाईल मालकाचा शोध घेवून त्यांना मोबाईल परत केला.

रिक्षा चालक संतोष दिलीप ताटे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा वाहतुक शाखा कराड शहरचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, हवालदार सुरेश सावंत, हवालदार संतोष पाटणकर तसेच रिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुसा शेख, रमजान कागदी, गफार नदाफ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close