मायक्रो ऑब्जर्वर म्हणजे निवडणूक आयोगाचे कान व डोळे – अतुल म्हेत्रे – changbhalanews
राजकिय

मायक्रो ऑब्जर्वर म्हणजे निवडणूक आयोगाचे कान व डोळे – अतुल म्हेत्रे

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक निर्भय, मुक्त व पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी सूक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑब्जर्वर) यांची महत्त्वाची भूमिका असून ते भारत निवडणूक आयोगाचे कान व डोळे असतात त्यांना थर्ड अंपायरची भूमिका पार पाडावी लागते असे प्रतिपादन 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केले. कराड तहसील कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये सूक्ष्म निरीक्षकांच्या (मायक्रो ऑब्जर्वर) बैठकीस मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी एस एस पवार, मायक्रो ऑब्जर्वर नोडल अधिकारी पटेल, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, निवडणूक नायब तहसीलदार युवराज पाटील व कृषी पर्यवेक्षक बाबा तोरणे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हत्रे पुढे म्हणाले, ज्या मतदान केंद्रावर संवेदनशील अथवा तणावपूर्ण वातावरण आहे तेथे सूक्ष्म निरीक्षक नेमले जातात. मतदान प्रक्रियेवेळी त्यांनी सर्व बाबींचे निरीक्षण व घडणाऱ्या घटनांचे अवलोकन करून त्याच्या माहितीचा अहवालते जनरल  ऑब्जर्वर यांना ते देतील व जनरल ऑब्जर्वर तो आयोगाकडे पाठवतात. मतदानाच्या वेळी घडणाऱ्या अनुचित घटना, तक्रारीचे प्रसंग अथवा कोणत्याही बेकायदेशीर बाबींवर सूक्ष्म निरीक्षकांकडून आलेल्या अहवालाची दखल घेऊन आयोग कारवाई करत असते. देशाच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये चांगली भूमिका निभवण्याची संधी मायक्रो ऑब्जर्वर म्हणून तुम्हा सर्वांना प्राप्त झाली असून एक चांगले राष्ट्रीय काम केल्याचा आनंदही यानिमित्ताने मिळेल. त्यामुळे दिलेले काम, वेळ व अचूकता या तीन गोष्टी तुम्ही तंतोतंत पाळाव्यात असे सांगून ते पुढे म्हणाले, कराड दक्षिण मध्ये 342 मतदान केंद्रावर 3000 कर्मचारी काम करणार आहेत. त्यासाठी तुम्ही 46 मायक्रो ऑब्जर्वर संवेदनशील केंद्रावर काम करणार आहात. तुमचे नेमून दिलेल्या  मतदान केंद्रावर संपूर्ण लक्ष असेल. सर्व कर्मचारी व्यवस्थित काम करत आहेत का ? केंद्र सुरळीत सुरू झाले आहे का ? याबाबतची माहिती तुम्हाला ठेवायची आहे. त्याचा 28 मध्ये रिपोर्ट तयार करून जनरल ऑब्जर्वरना द्यावयचा आहे. तसेच कराड दक्षिण मध्ये दिव्यांग व्यक्ती व 85 वर्षावरील मतदारांकरीता होम वोटिंग साठी 15 टीम नेमल्या असून त्या 14, 15 व 16 नोव्हेंबरला त्या टीम्स प्रत्यक्ष घरी जाऊन बॅलेट पेपरवर मतदान घेतील. कराड दक्षिण मध्ये 2300 दिव्यांग वोटर्स व सुमारे 3000 वोटर्स 85 वर्षाच्या वरील  आहेत. विशेषत: ॲबसेंट, शिफ्टेड किंवा डेथ मतदारांची लिस्ट केंद्राध्यक्षांकडे दिली जाईल. यापैकी मतदार मतदान करण्यास आला तर मतदान करू द्यायचे, मात्र त्याचे डबल आयडेंटीफिकेशन करायचे व त्याच्याकडून 14 नंबरचे ॲपेडेव्हीट भरून घेऊन त्यावर त्याचा सही व अंगठा घ्यावयाचा आहे. प्रत्येक मतदाराने आयोगाने दिलेल्या 12 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक मूळ पुरावा घेऊनच मतदान करण्यासाठी आला आहे का ? याचीही पडताळणी करावी. मॉक पोल शिवाय मतदान प्रक्रिया शून्य असते हे मायक्रो ऑब्जर्वरनी लक्षात घेऊन कामकाज करावे. मॉक पोल नंतर सीआरसी घेतली आहे का ? मतदान किती वाजता सुरू झाले व किती वाजता बंद झाले ? यासह अन्य अनेक बाबींचे महत्त्वाचे रिपोर्टिंग ऑब्जर्वरनी करायचे आहे, तसेच पोलिंग एजंट आतमध्ये मोबाईल घेऊन येणार नाहीत याचीही काळजी घ्यायची आहे. जिथे काही चुकीचे घडत असेल तेथील घटना निदर्शनास आणून द्यावी. 342 पैकी 171 केंद्रे वेब कास्टिंग आहेत, त्यामुळे मतदान अधिकार्‍यासह सर्वच  प्रक्रियेवर मायक्रो ऑब्जर्वर यांचे लक्ष राहील. यासह अन्य अनेक महत्वाच्या बाबींबाबत मायक्रो ऑब्झर्वर यांना निवडणूक निर्णय अधिकारी अतुल मेहत्रे यांनी पीपीटी च्या माध्यमातून विशेष मार्गदर्शन केले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close