साताऱ्यात मुक्त विद्यापीठातील गुणवंतांचा सत्कार
चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
मानवाच्या अंगी नम्रता,विनय व दातृत्व असावे.विचारांची देवाण- घेवाण झाली पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. वंदना नलवडे यांनी केले.
आझाद काॅलेज आॅफ एज्युकेशन येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्रातील बी.एड.मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी केंद्र समन्वयक डॉ. केशव मोरे, प्रा.डॉ. विनय धोंडगे, प्रा.सुधीर खरात यांची उपस्थिती होती.
प्राचार्या वंदना नलवडे म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सहशालेय उपक्रम राबविले जातात.शिक्षक हा ज्ञानाचे आदान-प्रदान करणारे असतात. यावेळी शिक्षक अतुल बोराटे, विष्णू ढेबे,वीरधवल भिलारे-पाटील यांनी बी.एड. च्या प्रथम वर्षामध्ये गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल,नेटसेट मध्ये यश संपादन केल्याबद्दल शरद जठार, मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल मीरा भिसे यांचा व आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सुवर्णा चोपडे यांचा व शाळेतील विद्यार्थ्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित केले बद्दल शिक्षक अभिनय अत्राम यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉ. केशव मोरे यांनी व सूत्रसंचालन प्रा. डॉ. विनय धोंडगे यांनी केले.