कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात निवडणूक निरीक्षकांची भेट!
कामकाजाची पाहणी करत घेतला आढावा

चांगभलं ऑनलाइन | कराड : प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज मंगळवार (ता.२९ ऑक्टोबर २०२४) रोजी २६०, कराड दक्षिण मतदार संघास निवडणूक निरीक्षक श्रीमती गीता ए यांनी भेट देऊन विविध विभागांची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला.
पाहणी दरम्यान निवडणूक निरीक्षक श्रीमती गीता ए यांना २६०, कराड दक्षिण निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार यांनी कामकाजाची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर श्रीमती गीता ए यांनी समाधान व्यक्त करत काही महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पी.पी.कोळी, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, नायब तहसीलदार युवराज पाटील, नायब तहसीलदार साहीला नाईकवडे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, नोडल अधिकारी प्रमोद मोटे, गोदाम व्यवस्थापक एम. एस. अष्टेकर, झोनल ऑफिसर एस. ए. पवार, मीडिया कम्युनिकेशनचे दिलीप माने यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी श्रीमती गीता ए यांनी २६०, कराड दक्षिण मतदार संघांतर्गत येत असलेल्या मतदान मोजणी केंद्र, मतदान यंत्रे सुरक्षा कक्ष, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे, त्या अंतर्गत येणाऱ्या स्क्रीन्स व मतदान यंत्रे वाटपासाठी करण्यात आलेल्या सोयी-सुविधा, त्यासाठी आवश्यक ती परिसरातील सुरक्षितता याची पाहणी केली. या दरम्यान निवडणुका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व सोयीनीयुक्त तयार केलेला परिसर व त्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत श्रीमती गीता ए यांनी समाधान व्यक्त केले.