हुतात्मा स्वा.सै. शंकर गोपाळ चिटणीस यांना स्वातंत्र्य सेनानी भाई गुजर पुरस्कार प्रदान
स्व. गंगारामजी केशवराव गुजर ऊर्फ भाई यांना पुण्यस्मरणदिनी मान्यवरांकडून अभिवादन
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्वर्गिय गंगारामजी केशवराव गुजर ऊर्फ भाई यांच्या ३५ व्या पुण्यस्मरणदिनी डॉ. अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिटयूटस डॉ. दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, विद्यानगर, बनवडी येथे राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, डॉ.अशोक गुजर, संपतराव जाधव, नंदकुमार बटाणे, किसनराव पाटील, शंकर खापे, राहुल पाटील, डॉ.माधुरी इंद्रजित गुजर, रामभाऊ कणसे, शफिक मुल्ला, पालेकर सर, प्राचार्य अन्वर मुल्ला व नागरीक उपस्थित होते.
यावेळी हुतात्मा स्वा.सै. शंकर गोपाळ चिटणीस (हुपरी कोल्हापूर) यांना जाहीर झालेला “स्वातंत्र्य सेनानी भाई गुजर पुरस्कार २०२४” हा पुरस्कार हुतात्मा शंकर चिटणीस यांचे सुपुत्र जयसिंग शंकर चिटणीस यांना आमदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
डॉ. अशोक गुजर यांनी भाई गुजर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील आठवणींना उजाळा दिला. संस्था स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसासाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
आ. बाळासाहेब पाटील यांनी सातारा जिल्हा हा क्रांतीवीराचा जिल्हा असल्याचे सांगून यशवंतराव चव्हाण, किसनवीर, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याविषयी माहिती दिली.
खासदार श्रीनीवास पाटील यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिवीरांना किती हालअपेष्टा सोसाव्या लागल्या याविषयी विवेचन केले तसेच आजच्या तरूण पिढीने हा इतिहास समजून घेतला पाहीजे , असे आवाहन त्यांनी केले. तसेच डॉ. गुजर हे स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसासाठी करत असलेल्या कार्याबद्दल गौरवोदगार काढले. आभार डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्वर मुल्ला यांनी मानले.