देशातील श्रीमंताच्या यादीत ‘हा’ उद्योगपती अव्वल – changbhalanews
Uncategorized

देशातील श्रीमंताच्या यादीत ‘हा’ उद्योगपती अव्वल

टाकलं ' या' उद्योगपतीलाही पाठीमागं : अब्जाधीश 259

चांगभलं ऑनलाइन | नवी दिल्ली प्रतिनिधी
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय बनले आहेत. त्यांनी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना पाठीमागे टाकले आहे. मंगळवारी ‘360 वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023’ ही यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये अंबानी 8.08 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह अव्वल स्थानावर आले आहेत.

या यादीत गौतम अदानी यांची घसरण होऊन ते दुसऱ्या स्थानावर राहिले आहेत, सध्या त्यांची संपत्ती 4.74 लाख कोटी रुपये आहे. भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यंदा हुरुण इंडियाने 12 वी वार्षिक रँकिंग यादी बनवली आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस एस. पूनावाला यांच्याकडे 2.78 लाख कोटी रुपयांची संपत्ती असल्याने ते तिसऱ्या स्थानावर कायम आहेत. एचसीएलचे शिव नाडर 2.28 लाख कोटींच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर तर गोपीचंद हिंदुजा यांनी 1.76 लाख कोटींच्या संपत्तीसह पाचवे स्थान पटकावले आहे.
सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे संस्थापक दिलीप संघवी 1.64 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह सहाव्या क्रमांकावर आले आहेत. एलएन मित्तल, राधाकिशन दमानी, कुमार मंगलम बिर्ला आणि नीरज बजाज यांचाही टॉप-10 यादीत समावेश आहे.

अब्जाधीशांची संख्या 259

या यादीत एकूण 259 अब्जाधीश आहेत, गतवर्षीच्या तुलनेत त्यामध्ये 38 ने वाढ झालीय. झेप्टोचे संस्थापक 20 वर्षीय कैवल्य वोहरा या यादीतील सर्वात तरुण अब्जाधीश आहेत. हुरुण लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर प्रथमच या यादीत समाविष्ट असलेल्या श्रीमंतांची एकत्रित संपत्ती 109 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हा आकडा सिंगापूर, यूएई आणि सौदी अरेबियाच्या एकत्रित जीडीपीपेक्षा जास्त आहे.
दरम्यान, यादीतील श्रीमंतांच्या संचित संपत्तीत 8.5 टक्क्याने वाढ झाली आहे, तर सरासरी संपत्ती 9.3 टक्केने घटली आहे. अहवालात असेही म्हटले आहे की सुमारे 1,054 व्यक्तींच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. मात्र 264 लोकांच्या संपत्तीत घट झाली आहे आणि 55 लोक यादीतून बाहेर पडले आहेत.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close
WhatsApp Group